Diabetes Diet Chart : डायबिटीज हा असा एक आजार आहे, ज्यामुळे रुग्णांना आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात आणि आपल्या आहार व जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण हा आजार कधी पूर्णपणे बरा करता येत नाही,फक्त नियंत्रित करता येतो.डायबिटीजमध्ये शरीर योग्य प्रकारे इन्सुलिनचा वापर करू शकत नाही.अशा परिस्थितीत शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. डायबिटीजमुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. डायबिटीज योग्य प्रकारे नियंत्रित करायचा असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं मानलं जातं.कारण आपण जे खातो त्याचा थेट परिणाम शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर होतो.जर तुमचा आहार योग्य नसेल तर डायबिटीज वाढू शकतो आणि त्याचा परिणाम किडनीच्या समस्या,नर्व्हस सिस्टीमचे नुकसान आणि हृदयविकार यांसारख्या आजारांवर होऊ शकतो.हा आजार नियंत्रित करण्यासाठी तुमचा आहार कसा असावा, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
डायबिटीज झालेल्या रुग्णांनी कोणत्या भाज्या खाऊ नये?
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी अशा भाज्यांचं सेवन टाळावं ज्यामध्ये स्टार्च असतो.तुम्ही पालक, ढोबळी मिरची आणि ब्रोकलीसारख्या भाज्या आपल्या आहारात समाविष्ट कराव्यात. या भाज्या फायबरने समृद्ध आणि कार्बोहायड्रेट कमी असतात. या भाज्यांचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी न वाढवता शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
आहारात या धान्यांचा समावेश करा
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात धान्यांचा समावेश करावा,जसे ब्राउन राईस,क्विनोआ,ज्वारी आणि ओट्स.हे लक्षात ठेवा की संपूर्ण धान्य शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखतात.
नक्की वाचा >> दिल्ली स्फोट प्रकरणात पुणे ATS ची धडक कारवाई! सोलापूरात 'त्या' आयटी इंजिनिअरकडे सापडले खळबळजनक पुरावे
हेल्दी फॅटचे सेवन करा
हेल्दी फॅट केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखत नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.हेल्दी फॅटचे सेवन शरीरातील सूज कमी करण्यासोबतच शरीराला ऊर्जा देखील पुरवते.हेल्दी फॅटसाठी डायबिटीज असलेल्या रुग्णांनी ऑलिव्ह ऑइल,ड्रायफ्रूट्स,बिया आणि ॲव्होकॅडो यांचा आहारात समावेश करावा.
डायबिटीज झालेल्या रुग्णांनी काय खाऊ नये?
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी खूप गोड पदार्थ किंवा ड्रिंक्सचे सेवन टाळावे.कारण हे शरीरात जाऊन रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. अशा लोकांनी पॅकेटबंद ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स, सोडा आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन टाळावे.याऐवजी डायबिटीज रुग्णांनी हर्बल टी किंवा साखर नसलेली चहा पिणे योग्य ठरेल. डायबिटीज असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमाणात रिफाइंड कार्बोहायड्रेट असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे.कारण हे पदार्थ शरीरात गेल्यावर ग्लुकोजचे प्रमाण वाढवतात.ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि कमी होते.अशा पदार्थांमध्ये पांढरी ब्रेड,पास्ता, केक, पेस्ट्रीज यांचा समावेश होतो.
नक्की वाचा >> Akshata Importance: पूजा करताना अक्षतांचं काय असतं महत्त्व? हे उपाय केल्यावर सर्व कामांमध्ये मिळतं मोठं सक्सेस
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी प्रोसेस्ड (प्रक्रिया केलेले)खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे, जसे डबाबंद सूप आणि डबाबंद रेडी-टू-ईट पदार्थ. तसेच ज्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते तेही टाळावेत. कारण जास्त मीठाचे सेवन केल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो.डायबिटीज रुग्णांसाठी उच्च रक्तदाब ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती ठरू शकते.
जास्त फॅट असलेले पदार्थ,जसे फुल क्रीम दूध,क्रीम,चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ डायबिटीज रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात. यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते,ज्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका निर्माण होतो.जास्त वजन आणि जास्त कोलेस्ट्रॉल हे देखील डायबिटीज रुग्णांसाठी गंभीर समस्या ठरू शकतात.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.