- मकसंक्रांतीपूर्वी भोगी सण साजरा केला जातो
- यंदा 13 जानेवारी रोजी भोगी सण साजरा केला जाईल
- भोगी शब्दाचा अर्थ आनंद घेणारा वा उपभोगणारा असा आहे.
Bhogi 2026 Date: मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti 2026) आदल्या दिवशी भोगी सण साजरा करण्याची परंपरा आहे. पौष महिन्यामधील मकर संक्रांतीच्या पर्वातील तीनही दिवसांचे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. भोगी सणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती 'श्री दत्तराज गुरुमाऊली' नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलीय, जाणून घेऊया सविस्तर..
भोगी म्हणजे काय? What Is Bhogi Festival | Bhogi Mhanje Kay?
पौष महिन्यामध्ये 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच भोगी सण होय.
भोगी शब्दाचा अर्थ काय? | When Is Bhogi On 13th Or 14th January? Bhogi 2026 Kadhi Ahe
यंदा 13 जानेवारी रोजी भोगी सण साजरा केला जाणार आहे. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ "आनंद घेणारा वा उपभोगणारा!" आहे. या दिवशी हा सण साजरा करत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला "भोग" म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोवला जातो, यालाच "भोगी देणे" म्हणतात.
भोगी सणाच्या दिवशी काय करावे?
भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर आणि घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशाप्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे.
ते म्हणजे मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी आणि लोणी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी या सर्वांची मिळून केलेली भाजी असा बेत करतात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते देवाची आणि सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याचीही पद्धत आहे! वर सांगितल्याप्रमाणे जर सवाष्ण जेवायला येणे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोवावा.
भोगी साजरी का करावी?भोगीच्या दिवशी इंद्र देवाचे स्मरण केले जाते. इंद्र देवाने आपल्या धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी, अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात.
वाचा संपूर्ण पोस्ट
भोगीच्या भाजीची रेसिपी, पाहा व्हिडीओ(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world