BSNL IFTV 61 RS 1000 Channels: घरोघरी प्रत्येकाकडे मोबाईल झाले असले तरी टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. टीव्ही पाहण्यासाठी दर महिन्याला 200 ते ३०० रुपये किंवा त्याहूनही अधिक खर्च होतो. त्यातही जर ओटीटी चॅनेल्स किंवा एचडी चॅनेल्स वापरायचे असतील तर त्याची किंमत आणखीच वाढते म्हणजे 600 ते 1000 रुपयांपर्यंत जाते. मात्र आता हा खर्च कमी होणार असून बीएसएनएलने एक सर्वात स्वस्त आणि मस्त ऑफर (BSNL IFTV Premium Pack) आणली आहे. ज्यामुळे अवघ्या 61 रुपयात महिन्याला 1000 हून अधिक चॅनेल पाहता येतील तसेच ओटीटी फ्लॅटफॉर्मही तुम्ही पाहू शकता. काय आहे ही बीएसएनएलची भन्नाट स्कीम अन् कशी कराल याची प्रक्रिया? जाणून घ्या
फक्त 61 रुपयात 1000 चॅनल्स |1000 Channels In Just 61
बीएसएनएलने त्यांची नवीन डिजिटल टीव्ही आणि ओटीटी सेवा, आयएफटीव्ही किंवा बीआयटीव्ही (भारत इंटरनेट टीव्ही) लाँच केली आहे. ही सेवा एसडी आणि एचडी दोन्ही चॅनेलसह ५०० हून अधिक लाईव्ह चॅनेल देते. यात हिंदी आणि इंग्रजी चॅनेल तसेच अनेक प्रादेशिक भाषांमधील चॅनेल समाविष्ट आहेत. सर्वात उत्तम म्हणजे, तुम्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि डिस्ने+ हॉटस्टार सारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि मालिका देखील पाहू शकता. आणि तुम्हाला हे सर्व फक्त ६१ रुपयांना महिन्याला मिळते. याचा अर्थ तुम्ही कमी किमतीत एकाच वेळी अनेक चॅनेल आणि चित्रपट सहजपणे पाहू शकता.
घरबसल्या कशी सुरु कराल स्कीम | How Active BSNL New Plan? Know Step By Step Process
BSNL ने त्यांच्या पोस्टमध्ये ही नवीन सेवा कशी सक्रिय करायची ते स्पष्ट केले आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला 18004444 वर WhatsApp करावे लागेल. तिथे "हाय" पाठवा, नंतर दिसणाऱ्या मेनूमधून "IFTV सक्रिय करा" निवडा आणि सेवा सक्रिय करा. IFTV वापरण्यासाठी, तुमच्याकडे BSNL चे भारत फायबर (FTTH) इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे, कारण ही सेवा फक्त या कनेक्शनवरच काम करते.