गेल्या काही वर्षात मानसिक आरोग्यबाबत आपण अधिक सजग झाल्याचं दिसून येत आहे. कार्यालयातील कामाचा ताण, धावपळीचं आयुष्य, नातेसंबंध, स्पर्धा यांसारख्या अनेक गोष्टीतून तणाव वाढत असल्याचं दिसतं. बऱ्याचदा याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र भविष्यात यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. युट्यूबर राज शमानी याने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने तणावाबद्दल डॉक्टरांसोबत एक शो केला होता. या शोमध्ये तणावावर चर्चा करण्यात आली. तणावावर वेळीच उपचार करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अन्यथा मोठा धोका उद्भवू शकतो.
सतत तणावात असाल तर तुमच्या शरीरात काय बदल होतात?
- तुम्ही बेंबीपासून श्वास घेत नाही तुम्ही नाकाने श्वास घेऊ लागता
- हार्मोन्समध्ये बदल होतील
- महिलांमध्ये मासिक पाळी असंतुलित होते
- पुरुषांमध्ये कोंडा येण्यास सुरुवात होते
- पोटासंबंधित आजार उद्भवतील
- पाय दुखू लागतात
- अस्वस्थता आणि भीती वाटत राहते
- सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही
तणावामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो का?
वर्षोनुवर्षे आपण तणावाचा सामना करीत असू तर आपल्या भावनिक, शारिरीक, मानसिक पातळीवर मोठा परिणाम होतो. यावर आपण काहीच काम केलं नाही किंवा उपाय केले नसतील तर त्याचे परिणाम कॅन्सरपर्यंत जाऊ शकतात.