Car Insurance Claim : ..तर थेट बँक खात्यात जमा होतील पैसे; कारवर झाड पडल्यास 'हे' काम करायला विसरू नका

Car Insurance Claim: गाडीवर झाड पडल्यास नुकसानभरपाई मिळणार की नाही, हे पूर्णपणे तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीवर अवलंबून असते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Car Insurance Claim : मुंबईत तर यंदा केवळ 9 दिवसांत तब्बल 1100 झाडे पडली आहेत.
मुंबई:

Car Insurance Claim: पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळणे आणि त्याखाली दबून वाहनांचे मोठे नुकसान होणे ही आता दरवर्षीचीच डोकेदुखी बनली आहे. मुंबईत तर यंदा केवळ 9 दिवसांत तब्बल 1100 झाडे पडल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. अशा अपघातात जेव्हा लाखो रुपयांची गाडी क्षणात मोडीत निघते, तेव्हा हतबल होण्याशिवाय आपल्यातात काहीच उरत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, की निसर्गाच्या या कोपामुळे झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते? यासाठी फक्त विम्याचा एक साधा नियम तुम्हाला माहित असायला हवा.

'हा' इन्शुरन्स असेल तरच पैसे मिळणार

गाडीवर झाड पडल्यास नुकसानभरपाई मिळणार की नाही, हे पूर्णपणे तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीवर अवलंबून असते. विम्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात; एक 'कॉम्प्रिहेन्सिव्ह' (सर्वसमावेशक विमा) आणि दुसरा 'थर्ड पार्टी' इन्शुरन्स. जर तुमच्याकडे केवळ 'थर्ड पार्टी' इन्शुरन्स असेल, तर तुम्हाला एका रुपयाचीही भरपाई मिळणार नाही. 

Advertisement

कारण या विम्यात तुमच्या गाडीमुळे दुसऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाते. परंतु, जर तुम्ही 'कॉम्प्रिहेन्सिव्ह' म्हणजेच सर्वसमावेशक विमा उतरवला असेल, तर मात्र कंपनीला तुमच्या गाडीच्या नुकसानीची पूर्ण भरपाई द्यावीच लागते. या विम्यामध्ये वादळ, पूर, भूकंप आणि झाड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून गाडीला पूर्ण संरक्षण मिळते.

( नक्की वाचा : Monsoon Home Care: पावसाळ्यात घराच्या भिंतींना ओल आलीय? खिशातला एकही रुपया खर्च न करता 'अशी' मिळवा सुटका )
 

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी फॉलो करा ही सोपी प्रोसेस

विमा सल्लागार सचिन शेडगे यांच्या माहितीनुसार, जर तुमच्या गाडीवर झाड पडले तर घाबरून न जाता काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक आणि वेळेत करणे गरजेचे आहे. सर्वात आधी गाडी जागेवरून न हलवता तिच्या चारही बाजूंनी नीट व्हिडिओ काढा आणि स्पष्ट फोटो काढून ठेवा, जेणेकरून गाडीचे नक्की किती नुकसान झाले आहे याचा पक्का पुरावा तुमच्याकडे राहील. त्यानंतर दुर्घटना घडल्यापासून 24 ते 48 तासांच्या आत तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधून त्यांना घटनेची अधिकृत माहिती द्या.

क्लेम सेटलमेंट आणि दुरुस्ती कशी होणार?

तुम्ही कंपनीला माहिती दिल्यानंतर विमा कंपनीचा सर्व्हेअर (निरीक्षक) प्रत्यक्ष घटनास्थळी किंवा गॅरेजमध्ये येऊन गाडीची पाहणी करेल. ही पाहणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही गाडी कंपनीच्या अधिकृत शोरूममध्ये किंवा विमा कंपनीशी करार असलेल्या कॅशलेस गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पाठवू शकता. 

या दुरुस्तीचा खर्च एकतर विमा कंपनी थेट गॅरेजला देईल किंवा सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ती रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे पावसाळ्यात सुरक्षित राहा आणि आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार नक्की तपासून घ्या.
 

Advertisement