Chandra Grahan 2024 : कसं असेल वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण? भारतात दिसणार का? काय आहे वेळ?

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Lunar Eclipse 2024 : या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण  (Lunar Eclipse 2024) सुरु होण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. बुधवारी म्हणजेच 18 सप्टेंबर 2024 रोजी अंशिक चंद्रग्रहण आहे. पहिलं चंद्रग्रहण 25 मार्च 2024 रोजी होते. भारतामध्ये याचा परिणाम झाला नव्हता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी असते चंद्रग्रहण?

चंद्रग्रहण ही एक खोगलीय घटना आहे. सूर्य (Sun), पृथ्वी (Earth) आणि चंद्र (Moon) जेंव्हा एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचा प्रकाश पृथ्वीमुळे चंद्रावर पडत नाही. खगोलशास्त्रातील या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. या काळात पृथ्वीचा सावली चंद्रावर पडते. यंदा सुपरमून आणि चंद्रग्रहण दोन्ही एकत्र असल्यानं खगोलप्रेमी मंडळींना दुहेरी पर्वणी आहे.

चंद्रग्रहणाचे तीन प्रकार असतात. उपछाया चंद्रग्रहणस अंशिक चंद्रग्रहण आणि पूर्ण चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी अंशिक आणि उपछाया चंद्रग्रहण आहे. 

अंशिक चंद्रग्रहण म्हणजे काय ?

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अंशिक चंद्रग्रहणामध्ये चंद्राच्या एका भागावर पृथ्वीची सावली पडते. पृथ्वी चंद्राला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे चंद्राचा फक्त एकच भाग लाल दिसतो. त्याला अंशिक चंद्रग्रहण म्हणतात. 

चंद्रग्रहणाची वेळ काय?

भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 18  सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी सुरु होईल. ते सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी संपेल. चंद्रग्रहणाचा कालावधी 4 तास 6 मिनिटे आहे. 

( नक्की वाचा : कोरोनानंतर आता या महामारीचा जगाला धोका ! 4 कोटी जणांचा मृत्यू होण्याची भीती )
 

कुठे दिसणार चंद्रग्रहण?

हे चंद्रग्रहण युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत महासगार, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्कटिक आणि अंटार्कटिकामधील काही भागामध्ये दिसेल. भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही.  

सुतक कालावधी आहे का?

चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरु होतो. या काळात धर्म-कर्म करत नाहीत, अशी अनेकांची श्रद्धा आहे. पण, भारतामध्ये यंदा चंद्रग्ररहण दिसणार नाही त्यामुळे सुतक कालावधी लागू होणार नाही. त्यामुळे हे नियम पाळू नयेत असं आवाहन 'कालनिर्णय'मध्ये करण्यात आले आहे. 

स्पष्टीकरण : हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV समुह याची पृष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

Topics mentioned in this article