Cooling Tips : AC चं बिल झिरो होणार! गच्चीवरच्या या साध्या युक्तीने अख्खं घर राहील फ्रिजसारखं कूल

Easy Ways to Make Your Home Cool: काही अत्यंत स्वस्त, सोपे आणि 100 टक्के प्रभावी घरगुती उपाय करून तुम्ही कडाक्याच्या उन्हातही तुमचे घर एकदम थंड ठेवू शकता.

जाहिरात
Read Time: 3 mins
Easy Way to make your home cool : तुम्ही कडाक्याच्या उन्हातही तुमचे घर एकदम थंड ठेवू शकता. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Easy Ways to Make Your Home Cool: बाहेर सूर्याचा प्रकोप वाढला असून तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. अशा परिस्थितीत तुमचे घरही दुपारच्या वेळी तंदूर तापू लागत असेल, तर आता काळजी करण्याचे कारण नाही. महागातल्या AC चे भरपूर बिल भरण्याची अजिबात गरज नाही. काही अत्यंत स्वस्त, सोपे आणि 100 टक्के प्रभावी घरगुती उपाय करून तुम्ही कडाक्याच्या उन्हातही तुमचे घर एकदम थंड ठेवू शकता. या उन्हाळ्यात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उष्माघातापासून सुरक्षित ठेवणाऱ्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.

गच्ची थंड करण्याची पद्धत

वाढती उष्णता आणि उन्हाच्या झळा लक्षात घेऊन नॅशनल हेल्थ मिशन, उत्तर प्रदेश (NHM UP) ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक अत्यंत महत्त्वाची पोस्ट आणि जनजागृती मोहीम शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हंटले  आहे की, कडक ऊन आणि भाजून काढणाऱ्या उष्णतेपासून बचाव करण्यासोबतच आपले घर थंड, सुरक्षित आणि आरामदायी ठेवण्यासाठी काही छोटे आणि सोपे बदल केले जाऊ शकतात.

Advertisement

NHM UP ने यावर भर दिला आहे की, हिरव्या जाळीचे शेडिंग, हीट इन्सुलेशन टाइल्स, रिफ्लेक्टिव्ह रूफ मटेरिअल्स (गच्ची थंड ठेवण्याचे तंत्रज्ञान) आणि मातीचे माठ यांसारखे साधे उपाय केवळ तुमच्या घराचे तापमान कमी करत नाहीत, तर या ऋतूत तुमच्या आरोग्याचे संरक्षण देखील सुनिश्चित करतात. या उन्हाळ्यात अशा स्मार्ट उपायांचा अवलंब करणे हा उष्णतेपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

गच्चीवर चुन्याचा लेप आणि हिरव्या जाळीची कमाल

या कडक उन्हात घर आतून शांत आणि थंड ठेवण्याचा पहिला आणि अचूक उपाय म्हणजे तुमची गच्ची. तुमच्या डोक्यावर असलेली ही गच्ची थंड राहिली, तर खालच्या खोल्यांमध्ये बसणे सुखद होईल. सध्या बाजारात रिफ्लेक्टिव्ह रूफ मटेरिअल्स म्हणजेच उष्णता परावर्तित करणारे पेंट आणि हीट इन्सुलेशन टाइल्सचा कल वाढला आहे. या युक्त्या सूर्याची उष्णता शोषून घेण्याऐवजी पुन्हा आकाशाकडे वळवतात.

हा उपाय खिशाला परवडत नसेल, तर काळजी करू नका. फक्त बाजारातून ग्रीन नेट शेडिंग म्हणजेच हिरवी जाळी विकत आणा आणि गच्चीवर बांधा. याशिवाय, गच्चीवर चुन्याचा पांढरा रंग (व्हाईट वॉश) देणे हा देखील गच्ची थंड ठेवण्याचा सर्वात हिट उपायांपैकी एक आहे. 

हा उपाय अगदी कमी खर्चात तुमच्या घराचे तापमान थेट 4 ते 5 अंशांपर्यंत खाली आणतो. हे सोपे जुगाड करून तुम्ही तापत्या उन्हातही तुमचे घर विना AC शिमलासारखे थंड ठेवू शकता. हे बजेट-फ्रेंडली उपाय केवळ तुमचे विजेचे बिल वाचवणार नाहीत, तर भीषण उन्हात संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुरक्षित ठेवतील.

( नक्की वाचा : Monsoon 2026: पावसाच्या वाटेत 'व्हिलन'ची एन्ट्री! शेतकरी ते सर्वसामान्य सर्वांचीच चिंता वाढली, वाचा सर्व अपडेट

कुल रूफ तंत्रज्ञान

आजी-आजोबांच्या काळातील काही घरगुती उपाय आजही मोठ्या ब्रँड्सना मागे टाकतात. घराच्या आतील वातावरण ताजेतवाने ठेवण्यासाठी फ्रीजऐवजी मातीच्या माठातील पाणी पिण्यास सुरुवात करा. हे केवळ तहान भागवत नाही, तर आरोग्यासाठीही वरदानापेक्षा कमी नाही. याचसोबत, दुपारच्या वेळी घराच्या खिडक्यांवर खसचे पडदे किंवा जाड सुती पडदे लावा आणि त्यावर थोडे पाणी शिंपडा. मग बघा, बाहेरून आदळून जी हवा आत येईल, ती एखाद्या कुलरपेक्षा कमी नसेल. हे छोटे आणि सोपे उपाय केवळ तुम्हाला भीषण उष्णतेपासून त्वरित आराम देत नाहीत, तर अचानक उद्भवणाऱ्या आजारांचा धोकाही मुळापासून टाळतात.

( नक्की वाचा : Snakes in House: घरात साप लपून बसलाय हे कसं ओळखाल? हे 5 संकेत दिसताच तातडीने सावध व्हा )
 

आरोग्यही राहील उत्तम आणि सुखद अनुभव

तज्ज्ञांच्या मते, यावेळच्या विक्रमी उष्णतेमध्ये शरीराला हायड्रेटेड ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. अशा परिस्थितीत घर थंड ठेवणे हे केवळ चैनीसाठी नाही, तर उन्हाळ्यातील सुरक्षितता मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा घराच्या आतील वातावरण थंड असते, तेव्हा उष्माघात किंवा डिहायड्रेशन सारख्या समस्या तुमच्या आसपासही फिरकणार नाहीत.

एकूणच, उष्णतेच्या या त्रासाशी लढण्यासाठी महागड्या गॅजेट्सपेक्षा समजूतदारपणा आणि स्मार्ट उपायांची जास्त गरज आहे. हे सोपे आणि स्वस्त उपाय करून तुम्ही केवळ भरमसाठ वीज बिलाच्या धक्क्यापासून वाचू शकता, तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही सुरक्षित ठेवू शकता

Advertisement