बटाटा टाचांना घासल्यास काय होईल? थंडीत रोज रात्री उपाय करून पाहा; बदल पाहून आश्चर्यचकीत व्हाल

Cracked Heels Home Remedies: थंडीच्या मोसमात त्वचेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Cracked Heels Home Remedies: थंडीचा मोसम सुरू झाला आहे. थंडीच्या मोसमात त्वचा कोरडी पडणे, टाचांना भेगा पडणे यासारखा अनेकांना त्रास होत असतो. थंडी वाढत जाते तसा हा त्रासही वाढत जातो. थंडीच्या मोसमात त्वचेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेतील आर्द्रता निघून गेल्याने त्वचा कोरडी झाल्याने ती निस्तेज दिसू लागते. थंडीच्या काळात त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. क्रीम, मॉईश्चरायझर्समुळे या समस्येपासून दिलासा मिळू शकतो असे म्हटले जाते, मात्र अनेकांना त्वचेसाठीची ही क्रीम त्रासदायक ठरतात. यामुळे आम्ही आज तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत,जो वापरल्याने तुमची त्वचा छान मॉईश्चराईज होईल आणि त्वचेतील आर्द्रता कमी झाल्याने होणाऱ्या त्रासापासूनही सुटका मिळेल. आपल्या सगळ्यांच्या घरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या बटाट्याचा वापर त्वचेशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. खासकरून टाचांना पडणाऱ्या भेगांच्या समस्येवर बटाटा हा रामबाण उपाय आहे.  pihuofficials.yt  या इन्स्टाग्रान प्रोफाईलवरून बटाट्याचा वापर चांगल्या त्वचेसाठी कसा करावा याच्या टीप्स सांगण्यात आल्या आहेत.  

नक्की वाचा: रिकाम्या पोटी वज्रासनाचा सराव केल्यास काय होईल?

बटाट्याचा वापर त्वचेसाठी कसा करावा ?

टाचांना भेगा पडल्या असल्यास एक बटाटा घ्यावा आणि तो अर्धा कापून घ्या. चाकूच्या मदतीने अर्धा कापलेल्या बटाट्यावर ओरखड्यासारखे लहान लहान कट करावे. यानंतर बटाट्यावर हळद, टूथपेस्ट आणि नारळाचे तेल लावावे आणि ते नियमितपणे टाचांवर घासावे. हा उपाय नियमितपणे केल्याने फरक पडतो. यामुळे टाचा पुन्हा एकदा मुलायम होतील आणि त्यांना भेगा पडण्याचे प्रमाणही कमी होईल.  

टाचांच्या भेगांवची समस्या दूर करण्यासाछी बटाट्याशिवाय इतरही उपाय आहेत. हे उपाय सोपे असून अत्यंत कमी खर्चात ते करणे शक्य असते. घरच्या घरी हे उपाय करता येत असल्याने फार त्रासही होत नाही. 
 

Advertisement

ग्लिसरीन और गुलाब पाणी

टाचांच्या भेगांची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याच्या मिक्श्चरचाही वापर केला जाऊ शकतो. ग्लिसरीनमुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि गुलाब पाण्यामुळे थंडावा मिळतो. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी सम समान प्रमाणात घेऊन एकत्र करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी त्याने टाचांना हलक्या हाताने मालिश करावे. काही दिवसांतच तुम्हाला परिणाम दिसू लागेल. 

लिंबू आणि मध

लिंबू आणि मध हे त्वचेसाठी फार उपयुक्त मानले जातात. त्वचेशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी याचा वापर अत्यंत प्रभावी मानला जातो. टाचांना भेगा पडल्या असल्यास लिंबाचा रस आणि मध एकत्र करावा आणि झोपण्यापूर्वी 15 मिनिटे टाचांना हे मिश्रण लावून ठेवावे. 15 मिनिटांनी पाय धुवून टाकावेत. यामुळे डेड स्किन दूर होईल आणि टाचा पुन्हा मुलायम होतील.  

Advertisement

तूप आणि हळद 

टाचांना भेगा पडलेल्या असल्यास तूप आणि हळदीचं मिश्रण करावे आणि ते टाचांना लावावे. टाचांप्रमाणे त्वचेसाठीही हे मिश्रण गुणकारी असते. यामुळे त्वचेला तुकतुकी लाभते आणि हळदीमुळे बॅक्टेरिया तसेच संसर्गापासूनही बचाव होतो.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)