Dhanteras 2025: इतके धन मिळेल की ठेवायला जागा पुरणार नाही, धनत्रयोदशीला 5 उपाय करून पाहाच

काही उपाय आहेत जे केल्याने लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद प्राप्त होईल असे सांगितले जाते. धनत्रयोदशीच्या निमित्ताने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठीचे 5 सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय कोणते आहेत ते पाहूया. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतातच नाहीतर जगातील अनेक भागांमध्ये दिवाळीचा सण हा गेल्या काही वर्षांत मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस असून 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी धनधान्याची पूजा केली जाते आणि भरभराटीची कामना केली जाते. लक्ष्मी म्हणजेच संपत्ती, त्यामुळे या दिवशी सोन्या-नाण्याची पूजा केली जाते, व्यापारी वर्ग हिशोबाच्या वह्यांची पूजा करतो. पुढील दिवाळीपर्यंत खर्च कमी आणि आवक जास्त व्हावी, धनामध्ये भर पडावी अशी प्रार्थना करत असतो. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास, तिची मनोभावे प्रार्थना केल्यास 13 पट अधिक लाभ होतो असे मानले जाते. काही उपाय आहेत जे केल्याने लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद प्राप्त होईल असे सांगितले जाते. धनत्रयोदशीच्या निमित्ताने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठीचे 5 सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय कोणते आहेत ते पाहूया. 

1. हिंदू प्रथा परंपरा आणि मान्यतेनुसार धनत्रयोदशीला घरामध्ये प्रदोष काळात 13 दिवे प्रज्ज्वलित करावेत, देवासमोर दिवा लावत असताना दिवे अथवा पणत्या प्रज्ज्वलित करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवावे. जेणेकरून घरातील अंधार दूर येईल.  

2. असे मानले जाते की, धनत्रयोदेशीला प्रदोष काळात पूजा करण्यासाठी लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो आपण घेणार असू तो त्याच दिवशी खरेदी करणे हे लाभदायक मानले जाते. मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ही प्रतिमा मातीची किंवा धातूची असावी, प्लॅस्टीकची प्रतिमा अथवा मूर्ती घेऊ नये.  

3. धनत्रयोदशीला धन्वंतरींचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की अमृत मंथनातून ज्या 14 रत्नांचा जन्म झाला त्यामध्ये भगवान धन्वंतरींचाही समावेश होता. धन्वंतरींची पूजा करत असताना ‘ॐ नमो भगवते धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नमः' या मंत्राचा जप करणे लाभदायी ठरते. धन्वंतरींची पूजा करत असताना लवंगा अर्पण केल्याने सुख समृद्धी वाढते आणि पैशांची चणचण कमी होते.  

Advertisement

4. धनत्रयोदशीला लक्ष्मी माता आणि धन्वंतरींप्रमाणेच कुबेराचीही पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला उत्तरेच्या दिशेला कुबेराची प्रतिमा ठेवावी आणि त्यासमोर तुपाचा दिवा लावावा. कुबेराला आवाहन करण्यासाठी  ‘ॐ यक्ष राजाय विद्महे, वैश्रवणाय धीमहि, तन्नो कुबेराय प्रचोदयात्' चा जप करावा. 

5. अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीला कवड्या, गुंजाच्या बिया आणि नारळ घरी आणणे शुभ मानले जाते. कवड्या घरातील धनासोबत ठेवल्यास धनामध्ये वृद्धे होते असा समज आहे.  

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)