DMart News: डीमार्टमध्ये ‘या’ वस्तू कधीच का मिळत नाहीत? समोर आले मोठे कारण

या वस्तू डीमार्ट मुद्दामहून आपल्या स्टोअरमध्ये ठेवत नाही. यामागे त्यांचे पक्के बिझनेस प्लॅनिंग आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतात किरकोळ विक्री क्षेत्रात डीमार्टने (DMart) आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य ग्राहकांची पहिली पसंती ही डीमार्टला असल्याचं ही आता स्पष्ट झाला आहे. महिन्याचं सामाना, सणासाठी लागणाऱ्या वस्तू, ऐवढेच काय तरा पाहुणे आले तरी त्यांचा पाहुणचार ही याच डी मार्टमध्ये करण्याचा एक ट्रेंड निर्माण झाला आहे. असं असताना तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का की, काही महत्वाच्या आणि तेवढ्याच गरजेच्या वस्तू डीमार्टमध्ये कधीच उपलब्ध नसतात? ही कोणती चूक नसून, त्यामागे व्यावसायिक रणनीती (Business Strategy) आहे. डीमार्ट प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर खपणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करते.

डीमार्टच्या कोणत्याही स्टोअरमध्ये ताजे मांसाहारी पदार्थ (मटण, चिकन, मासे) मिळत नाहीत. काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात फ्रोजन फूड मिळते. मात्र ताजे मांस विकणे डीमार्ट टाळते. यामागे स्वच्छता, साठवणूक आणि क्लिष्ट लॉजिस्टिक्स ही मुख्य कारणे आहेत. याचप्रमाणे पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या नाशवंत हिरव्या पालेभाज्याही येथे ठेवल्या जात नाहीत. या भाज्या लवकर खराब होत असल्याने त्यांची गुणवत्ता राखणे आणि दररोज मोठा साठा सांभाळणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही.

Advertisement

नक्की वाचा - भारतीय रेल्वेच्या सीट नेहमी निळ्या रंगाच्याच का असतात? कारण जाणून म्हणाल, रेल्वेने तर डोकं लावलं

डीमार्टमध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नसतात. डीमार्टचे संपूर्ण मॉडेल हे 'हाय-वॉल्यूम, लो-मार्जिन' वर चालते. म्हणजेच, कमी नफा ठेवून जास्त प्रमाणात वस्तू विकणे. महागड्या वस्तूंमध्ये गुंतवणूक अडकून पडण्याचा धोका असतो, जो डीमार्ट पत्करत नाही. त्यामुळे मद्य, ताजी दुग्धजन्य उत्पादने आणि महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंऐवजी डीमार्ट केवळ रोजच्या वापरातील किराणा साहित्यावर भर देते.

नक्की वाचा - Positive news: पुस्तके वाचा अन् शिक्षा कमी करा! 'या' देशात कैद्यांना दिली जाते खास सवलत, भारतातला नियम काय?

त्यामुळे मासे असो की चिकन मटण, अंडी असो की भाजेपाला या गोष्टी खरेदी करण्यासाठी आपल्याला डीमार्ट बाहेरचीच वाट धरावी लागते. डीमार्टच्या कोणत्या ही स्टोअरमध्ये या वस्तू कधीच आपल्याला मिळत नाहीत. त्यामागे एक रणनीती आहे. त्याचा फायदा ही डी मार्टला होताना दिसत आहे. शिवाय वेगवेगळ्या ऑफर्समुळेही ग्राहक डी मार्टकडे वळताना आपल्याला दिसतात. नाशवंत  वस्तू डीमार्ट मुद्दामहून आपल्या स्टोअरमध्ये ठेवत नाही. यामागे त्यांचे पक्के बिझनेस प्लॅनिंग आहे हे आता स्पष्ट झाले आहे.