Priyanka Chopra Latest Instagram Video : परफ्यूम मारल्याने संपूर्ण तुमचा लूक अतिशय सुंदर बनतो. पूर्ण आऊटफिट घालत्यानंतर लोक परफ्यूम मारतात. पण जर तुम्ही ज्वेलरी घातल्यानंतर परफ्यूम मारत असाल, तर असं केल्याने तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. याबाबत सुपरस्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला आहे. लाखो रुपयांची ज्वेलरी घातल्यानंतर जर तुम्ही परफ्यूमचा स्फ्रे मारत असाल, तर त्याचे काय परिणाम होतात. याविषयी प्रियांकाने माहिती दिली आहे. ही एक ब्यूटी टीप्स नाही, तर लाखो रुपयांची ज्वेलरी दिर्घकाळ चमकदार आणि नवीन ठेवण्याचं सीक्रेटही आहे. या सीक्रेटच्या मागे नेमकं काय कारण आहे? ज्वेलरी घातल्यानंतर परफ्यूम मारण्याची ही पद्धत चुकीची का आहे? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
काय म्हणाली प्रियांका चोप्रा?
सोशल मीडियावर ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती सांगते की, दागिने घातल्यानंतर कधीही परफ्यूम मारू नका. अशावेळी सर्वात आधी परफ्यूम मारून घ्या. हेअर स्प्रे मारा आणि त्यानंतरच दागिने घाला. यामुळे दागिन्यांची चमक कमी होणार नाही. दागिन्यांवर परफ्यूम शिंपडल्याने नुकसान होऊ शकतं.
परफ्यूम आणि हेअर स्प्रे मध्ये असलेलं अल्कहोल,तेल आणि केमिकल कम्पाऊंड मेटलच्या संपर्कात येतं. त्यामुळे त्याची चमक खराब होऊ शकते. यामुळे दागिन्यांवर काळ्या रंगाची छटाही निर्माण होऊ शकते. सोनं, प्लॅटिनम आणि हिरे किंवा मोत्याचे दागिने खूप सेन्सेटिव्ह असतात. हे वेगाने केमिकलच्या संपर्कात येतात. यामुळे दागिन्यांची चमक खराब होण्यास मदत मिळते. अशातच पुढच्या वेळी सर्वात आधी परफ्यूम मारून घ्या आणि त्यानंतर दागिने घाला.
लाखो रुपयांच्या दागिन्यांची कशी घ्याल काळजी?
जर तुमच्याकडे डायमंडची ज्वेलरी आहे. तर ती ज्वेलरी सांभाळून ठेवा आणि थोड्या वेगळ्या ठिकाणी ठेवा.दागिने एकत्र ठेवल्यास त्यांची चमक खराब होण्याची शक्यता असते. तुम्ही दागिने सॉफ्ट पाऊच आणि बॉक्समध्ये ठेऊ शकता.
नक्की वाचा >> Video : "फॉरेनची पाटलीण..", ट्रॅफिकमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने असं काही केलं..सर्वच थक्क झाले!
दागिने काळजीपूर्वक स्वच्छ करा
दागिने साफ करण्यासाठी कोमट पाणी, साबण आणि सॉफ्ट ब्रशचा वापर करू शकता. जर तुम्ही केमिकलच्या क्लीनिंग प्रोडक्ट्सचा वापर करत असाल,तर दागिन्यांची चमक कमी होऊ शकते.
वर्कआऊट करण्याआधी काढून टाका
जर तुम्ही रोज रिंग किंवा चैनसारख्या ज्वेलरी घालत असाल, तर वर्कआऊटच्या आधी ते दागिने काढून टाका. घामामुळेही दागिन्यांची शाईन कमी होऊ शकते.
नक्की वाचा >> Shafali Verma : शेफाली वर्माचं शतक हुकलं, पण 87 धावा करून रचला इतिहास! आजपर्यंत कोणताही पुरुष क्रिकेटर करू शकला नाही