- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त देशभर उत्साहात विविध प्रकारे साजरी केली जात आहे
- भीमजयंतीच्या दिवशी नागरिक सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश आणि बाबासाहेबांच्या कोट्स शेअर करण्यासाठी उत्सुक आहेत
- आंबेडकरांच्या संवैधानिक हक्क आणि शिक्षण विषयक विचारांचा प्रचार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मंगळवारी 14 एप्रिलला देशभर उत्साहात साजरी होत आहे. या दिनाचे औचित्य साधून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भीमजयंतीनिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि स्टेटसचा हा खजिना तुमच्यासाठी आम्ही आणला आहे. हे खास संदेश आपल्या प्रिजनाना पाठवून तुम्ही महामानवाला अभिवादन करु शकतात. यंदा सोशल मीडियावर 'संवैधानिक हक्क' आणि 'शिक्षण' या विषयांवरील बाबासाहेबांच्या कोट्सना अधिक पसंती दिली जात आहे. केवळ शुभेच्छा न देता, त्यांच्या साहित्यातील निवडक उतारे व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून शेअर करण्याकडे नेटिझन्सचा कल वाढला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिक विविध डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील संदेशांचा समावेश आहे:
- "जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्यांनी लिहिली, त्या महामानवास कोटी कोटी प्रणाम. भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"
- "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मंगलमयी शुभेच्छा."
- "कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे आणणाऱ्या सूर्याला मानाचा मुजरा. जय भीम!"
निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे,घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे… डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा जय भीम, अशा शुभेच्छा ही तुम्ही देऊ शकता. "जगातील शोषित, पीडितांना हक्क मिळवून देणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा!,दगड झालो तर दिक्षाभूमीचा होईल, माती झालो तर चैत्यभूमीचा होईल...जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर भीमजयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच निळा रंग ओसंडून वाहत आहे. तरुण पिढी बाबासाहेबांच्या भाषणातील प्रेरणादायी सुविचार आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारे छोटे व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवत आहेत. अनेक ठिकाणी 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता एकाच वेळी डिजिटल अभिवादन करण्याची तयारीही अनुयायांनी केली आहे. त्यात तुम्ही काही स्टेटससाठी छोटे संदेश ठेवू शकता. त्यात "विचारवंत, युगपुरुष, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!,"भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! "बाबासाहेबांचे विचार, आचरणात आणूया, समतावादी समाज घडवूया!"