पृथ्वीचा शेजारी सापडला! अवकाशात अगदी पृथ्वीसारखा ग्रह, अवघा 25 प्रकाशवर्ष दूर...

पृथ्वीपासून कोटी मैल दूर एका नव्या पृथ्वीचा शोध लावण्यात आला आहे. होय... वैज्ञानिकांनी पृथ्वीसारखा एक अन्य खगोलीय ग्रहाचा शोध लावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पृथ्वीपासून कोटी मैल दूर एका नव्या पृथ्वीचा शोध लावण्यात आला आहे. होय... वैज्ञानिकांनी पृथ्वीसारखा एक अन्य खगोलीय ग्रहाचा शोध लावला आहे. जिथं जीवनाची शक्यता असू शकते. हा एक खडकाळ ग्रह आहे. अशा ग्रहांना एग्सोप्लेनेट किंवा बाह्यग्रह म्हणतात. हा नवीन ग्रह पृथ्वीपासून २५ प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचं म्हटलं जातं. या ग्रहावर याच्या ताऱ्याचं रेडिएशन सातत्याने पडत आहे. या ग्रहाबाबत आणखी काय माहिती समोर आली, याबाबत जाणून घेऊया. 

खगोलशास्त्रज्ञांचं काय आहे म्हणणं? 

अंतरिक्ष वैज्ञानिकांनी सुदुर ब्रम्ह्यांडात एका अशा ग्रहाविषयी माहिती मिळाली आहे, जिथे जीवनातील शक्यतांचा शोध घेतला जात आहे.  Space.com नुसार, या ग्रहाचं नाव GJ 3378b आहे. हा ग्रह पृथ्वीपासून २५ प्रकाशवर्ष दूर आहे. हे अंतर फार जास्त नाही. आपली आकाशगंगा १ लाख प्रकाशवर्षात पसरलेली आहे. त्यामुळे हा एक जवळचा ग्रह असल्याचं म्हटलं जात आहे. GJ 3378b नावाचा हा ग्रह, कॅमेलोपार्डालिस तारामंडळतील एक धूसर लाल बटू ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो. २०२४ मध्ये फ्रेंच खगोलशास्त्रज्ञांनी मौना केआ येथील कॅनडा-फ्रान्स-हवाई टेलिस्कोपचा वापर करून याचा शोध लावला होता.  अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी सुरुवातीच्या निष्कर्षांमध्ये सुधारणा करून, हा ग्रह पृथ्वीसारखा असण्याची शक्यता असल्याचं शोधून काढलं आहे.

Advertisement

या एक्सोप्लेनेटचा द्रव्यमान पृथ्वीपासून २.३ पट आहे आणि २१ दिवसात कक्षेची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ते त्याच्या ताऱ्याच्या राहण्यायोग्य क्षेत्रात स्थित आहे. या गोष्टीचं महत्त्व म्हणून वाढतं कारण ब्रम्हांडात पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र जीवनाच्या संभाव्य चिन्हांच्या शोधात त्याची भूमिका महत्त्वाची ठरते. 

GJ 3378b हा ग्रह त्याच्या ताऱ्यासमोरून जात असल्याचे दिसत नाही, त्यामुळे ताऱ्याचा प्रकाश आपल्या दृष्टीस पडत नाही. जेव्हा याच्या गुरुत्वाकर्षणाने आपल्या मूळ ताऱ्याला आपल्याकडे ओढलं तेव्हा याबाबत माहिती मिळाली. 

या गुरुत्वाकर्षणामुळे तारा, ग्रहासोबत सामायिक असलेल्या वस्तुमान केंद्राभोवती डगमगतो. हे डगमगणे ताऱ्याच्या प्रकाशातील डॉप्लर शिफ्टद्वारे ओळखले जाते, जे ताऱ्याने उत्सर्जित केलेल्या प्रकाशाच्या तरंगलांबीवरून, म्हणजेच त्याच्या वर्णपटावरून मोजले जाऊ शकते.

जेव्हा २०२४ मध्ये याचा शोध लागला होता, तेव्हा याचं द्रव्यमान पृथ्वीच्या द्रव्यमानाच्या ५.२६ पट होतं. ज्यामुळे हा मिनी नेपच्यूनच्या श्रेणीत आला. दोन वेगवेगळ्या टेलीस्कोपचा वापर करीत हा ग्रह पुन्हा पाहिल्यावर रॉबर्टसनची टीम हे दाखवू शकली की, ग्रहाचं खरं द्रव्यमान पृथ्वीच्या द्रव्यमानापेक्षा २.३ पट आहे. याचा अर्थ हा प्रत्यक्षात एक खडकाळ सुपर पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. भविष्यात एलियन प्लेनेटवर जीवनाचा शोध घेताना या ग्रहाची महत्त्वाची भूमिका असू शकते. 

Advertisement

Topics mentioned in this article