15 आठवड्यांत केलं 22 किलो वजन कमी, घरीच बनवा 'ही' Fat Loss सुपर ड्रिंक, फिटनेस ट्रेनरने शेअर केला व्हिडीओ

फिटनेस आणि वेट लॉस कोच नेहा परिहार,जिने फक्त 15 आठवड्यामध्ये 22 किलो वजन कमी केलं. वजन कमी करण्यासाठी तिने नेमकं काय केलं? याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Fitness Trainer Neha Parihar Video

Fat Loss Drink Recipe Video :  बदलत्या जीवनशैलीमुळे वजन झपाट्यानं वाढतं आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण सप्लिमेंट्स आणि डाएटचा आधार घेतात,पण त्यांना अपेक्षित असा रिझल्ट मिळत नाही. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. फिटनेस आणि वेट लॉस कोच नेहा परिहार,जिने फक्त 15 आठवड्यामध्ये 22 किलो वजन कमी केलं. वजन कमी करण्यासाठी तिने नेमकं काय केलं? याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने फॅट लॉस आणि गट रीसेट ड्रिंकची रेसिपी सांगितली आहे. जर तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल तर या ड्रिंकचं सेवन करू शकता. यामुळे फॅट लॉस तर होतोच,शिवाय शरीराला अनेक फायदेही मिळतात.

फॅट लॉस ड्रिंकसाठी लागणारे साहित्य

1 मोठा चमच अजवाइन
2 मोठे चमचे बडीशेप
1 मोठा चमचा मेथी दाणे
1 मोठा चमचा ताजे किसलेले आले
2.5 लिटर पाणी

कशी बनवायची फॅट लॉस ड्रिंक? पाहा रेसिपीचा व्हिडीओ

हे फॅट लॉस ड्रिंक बनवणे खूप सोपे आहे.यासाठी तुम्ही पाण्यात अजवाइन,बडीशेप आणि मेथी दाणे टाका आणि नंतर ते उकळून घ्या. त्यानंतर गॅसची हिट कमी करा आणि हळूहळू ते शिजवा.मग शेवटच्या काही मिनिटांत किसलेले आले पाण्यात मिसळा.नंतर गॅस बंद करा,गाळून घ्या आणि साठवून ठेवा. हे पिण्यापूर्वी त्यात अर्धा चमच लिंबाचा रस नक्की मिसळा.

Advertisement

कधी करावे सेवन?

फिटनेस कोच नेहा परिहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रिंक दिवसभरात थोड्या थोड्या प्रमाणात प्यावे. हे डिंक्र सलग 14 दिवस प्यायल्यावर आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं.  

या ड्रिंकचे फायदे काय आहेत?

या ड्रिंकचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.
हे ड्रिंक इन्सुलिन सेंसिटिव्हिटीला सपोर्ट करते,ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
हे नैसर्गिकरीत्या मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते आणि पोटातील सूज कमी करते.

Advertisement

काय लक्षात ठेवावे?

कोच नेहा व्हिडीओत सांगतात की. हे ड्रिंक कोणतेह्या प्रकारचं चमत्कारिक औषध नाही,ते फक्त तुमच्या शरीराला सपोर्ट करते. जेणेकरून वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होईल. जर हे ड्रिंक संतुलित आहार,हलका व्यायाम आणि पुरेशी झोप या त्रिसुत्रीसोबत घेतलं,तर वेळेनुसार तुम्हाला आरोग्याचे फायदे नक्कीच मिळतील.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.