फळं खाणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अनेकदा आपण फळे नुसती धुवून खातो, तर कधी फ्रूट चाट बनवतो. फ्रूट चाटमध्ये सफरचंद, केळी, पेरू, टरबूज, अननस यांसारख्या विविध प्रकारच्या फळांचा समावेश असतो. प्रत्येक फळाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. या संदर्भात, डॉ. दीप्ती खटुजा, हेड क्लिनिकल न्यूट्रिशन, FMRI गुडगाव यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने फळे खावी की न खावी याबाबत ही त्यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
नक्की वाचा - Skin Care: पावसाळ्यात त्वचा होत असेल चिकचिक, तर सकाळी उठल्यावर करा 'हे' 7 उपाय
अनेक फळे एकत्र खाणे योग्य आहे का?
डॉ. दीप्ती खटुजा यांच्या मते, वेगवेगळ्या प्रकारची फळे एकत्र खाणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. जर तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा विचार करत असाल, तर त्यानुसार फळांचा समावेश फ्रूट चाटमध्ये करावा.
कोणत्या परिस्थितीत कोणती फळे खावीत?
डॉ. दीप्ती खटुजा सांगतात की, तुम्ही कोणत्याही फळाचे सेवन कधीही करू शकता, परंतु काहीवेळा विशिष्ट सल्ले दिले जातात त्यात वजन कमी करण्याबाबतही सल्ले आहेत. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर केळीचे सेवन कमी प्रमाणात करा.
शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स
जर तुम्ही शुगर नियंत्रणात ठेवण्याचा विचार करत असाल, तर चिकूसारख्या जास्त गोड फळांचे प्रमाण डाएटमध्ये कमी ठेवा. कमी गोड फळे जास्त प्रमाणात फ्रूट चाटमध्ये समाविष्ट करा. जेणेकरून तुम्हाला विविध प्रकारच्या फळांमधील पोषकतत्त्वे मिळतील. जर तुम्ही हे सल्ले मानले तर तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले ठरू शकते. शिवाय त्यातून तुम्हाला मिळणारी उर्जा ही अधिक असते. त्यामुळे हा सल्ला नक्की ऐकावा असाच आहे.
केळी कोणी खाऊ नये?
डॉक्टरांनी सांगितले की, जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर केळीचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे. परंतु ती पूर्णपणे टाळणे योग्य नाही. कारण केळी पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे तुमच्या फ्रूट चाटमध्ये केळीचा समावेश नक्की करा, पण कमी प्रमाणात. यासोबतच, डॉक्टरांनी सांगितले की केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे, किडनीच्या रुग्णांना ती खाण्याचा सल्ला दिला जात नाही. तो त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो.