Foot Massage: रात्री झोपण्यापूर्वी पायांना तेल मालिश करण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या आयुर्वेदिक कारण

प्राचीन ग्रंथांमध्ये पदाभ्यंगला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवण्यास सांगितले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Foot Massage Benefits: रात्री झोपण्यापूर्वी पायांना तीळ किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करणे ही एक जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे.  ज्याला 'पदाभ्यंग' (Foot Massage) असे म्हटले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, थकवा आणि अपुरी झोप या सामान्य समस्या बनल्या आहेत. अशा वेळी, हा साधा उपाय मन आणि शरीर दोघांनाही शांतता देण्याचा एक सोपा मार्ग ठरू शकतो. आयुर्वेदात स्पष्ट केले आहे की, पदाभ्यंग केल्याने शरीरातील वात दोष संतुलित होतो. वात दोष शांत झाल्यामुळे शरीरातील नाड्या (नसा) शांत होतात. गाढ झोप लागते. चरक संहिता आणि अष्टांग हृदयम यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये पदाभ्यंगला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवण्यास सांगितले आहे.

पदाभ्यंगचा संपूर्ण शरीरावर परिणाम
आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये सुमारे 72,000 नाड्या (नर्व्ह्स) असतात. ज्या थेट शरीरातील वेगवेगळ्या अवयवांशी जोडलेल्या असतात. यात हृदय, फुफ्फुसे, पचनसंस्था आणि मेंदू यांचा समावेश असतो. जेव्हा या बिंदूंवर तेलाने मालिश केली जाते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शरीरावर जाणवतो. त्यामुळे आपल्याला आराम मिळतो. नसा मोकळ्या होतात. ते शरीरासाठी चांगली गोष्ट मानली जाते. 

तीळ तेल: मालिशसाठी तीळ तेल सर्वोत्तम मानले जाते. ते वातासाठी रामबाण औषधसमजले जाते. शिवाय त्वचेला पोषण देते. हाडे मजबूत करण्यास मदत करते.

मोहरी तेल: मोहरीचे तेल सर्दी-पडशापासून बचाव करते. रक्तप्रवाह वाढवते.  स्नायूंच्या वेदना कमी करते. विशेषत: हिवाळ्यात मोहरीचे तेल अधिक फायदेशीर ठरते. कारण ते शरीरात उष्णता निर्माण करते.

Advertisement

मॉलिश करण्याची योग्य पद्धत
पायांची मालिश करण्याची पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी पाय चांगले धुऊन कोरडे करा. त्यानंतर थोडेसे कोमट तेल घेऊन तळवे, टाचा आणि पोटऱ्यांवर 5 ते 10 मिनिटे हलक्या हातांनी मालिश करा. मालिश झाल्यावर तेल चादरीला लागू नये म्हणून मोजे (सॉक्स) घालू शकता. एवढे केल्यानेच शरीराचा तणाव हळूहळू कमी होतो आणि शांत व गाढ झोप येऊ लागते. आधुनिक विज्ञानदेखील या प्राचीन पद्धतीला दुजोरा देते. न्यूरोलॉजी आणि रिफ्लेक्सोलॉजीनुसार, पायांची मालिश केल्याने मज्जासंस्था (नर्वस सिस्टीम) शांत होते, रक्तप्रवाह सुधारतो आणि डोपामाइन व सेरोटोनिन सारखी 'आनंदी हार्मोन्स' (Happy Hormones) सक्रिय होतात, ज्यामुळे झोप आणि मनःस्थिती (Mood) सुधारण्यास मदत होते.