अनेक लोकांचा असा समज असतो की भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास ती दीर्घकाळ ताजी राहतात. मात्र, विज्ञान सांगते की काही विशिष्ट वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या केवळ त्यांचा मूळ स्वाद आणि पोत गमावत नाहीत, तर काही वेळा आरोग्यासाठी हानिकारकही (Harmful) ठरू शकतात. तुम्ही जर खालील चार वस्तू फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर त्या का ठेवू नयेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आणि ठेवत असात तर ते ठेवणे त्वरीत बंद करा.
फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत?
1. बटाटा (Potato):
कॅन्सरजन्य धोका निर्माण होतो. बटाट्यामध्ये स्टार्चचे (Starch) प्रमाण जास्त असते. थंड तापमानात हे स्टार्च साखरेत (Sugar) रूपांतरित होऊ लागते. फ्रीजमध्ये ही प्रक्रिया जलद होते. जेव्हा तुम्ही हे बटाटे नंतर शिजवता किंवा तळता, तेव्हा त्यातून 'एक्रिलामाइड' (Acrylamide) नावाचे रसायन तयार होऊ शकते. हे रसायन आरोग्यासाठी हानिकारक असून कर्करोगास (Cancer) कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे बटाटे नेहमी थंड आणि कोरड्या जागी साठवावेत.
2. कांदा (Onion):
ओलावा आणि बुरशी तयार होते. कांद्यामध्ये सल्फरयुक्त रसायने असतात आणि त्याची बाहेरील साल पातळ असते. जी हवेतील ओलावा शोषून घेते. फ्रीजमध्ये ठेवल्यास ओलावा वाढतो. ज्यामुळे कांद्यामध्ये जिवाणू (Bacteria) आणि बुरशी (Fungus) वाढू लागते. यामुळे कांद्याची चव बदलते आणि तो आजूबाजूच्या वस्तूंचा वासही शोषून घेतो.
3. टोमॅटो (Tomato):
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची चव फिकी होते. टोमॅटोमध्ये असे रासायनिक घटक असतात, जे त्याला ताजेपणा आणि सुगंध देतात. थंड तापमानात हे घटक निष्क्रिय (Inactive) होतात. यामुळे टोमॅटोची चव फिकी होते आणि त्याचा पोत पाणीदार (Watery) बनतो. टोमॅटो नेहमी सामान्य तापमानात (Room Temperature) ठेवणे योग्य आहे.
4. केळी (Banana):
फ्रिजमध्ये केळी लवकर खराब होतात. केळ्यामध्ये 'पॉलीफेनॉल ऑक्सीडेज' नावाचे एन्झाईम (Enzyme) असते. जे फळ पिकण्यास मदत करते. फ्रीजच्या थंड तापमानात हे एन्झाईम निष्क्रिय होते, ज्यामुळे केळी बाहेरून काळी, मऊ होतात. शिवाय केळ्याची चव बिघडते. त्यामुळे केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. फ्रिजमध्ये ठेवलेली केळी खाणे आरोग्यास घातक ठरू शकतात.