Gemini AI Photos Trend Safety: क्षणाचा आनंद, आयुष्यभर मनस्ताप! जेमिनी ट्रेंड वापरताना काय काळजी घ्यावी?

AI tools Trending Nano Banana Saree Photos Safety Features: आपल्या फोटोंची सुरक्षितता आणि गोपनीयता याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण, एकदा अपलोड केलेले फोटो एआय टूलच्या मदतीने गैरवापर किंवा डीपफेकसाठी वापरले जाऊ शकतात.

जाहिरात
Read Time: 3 mins

AI Photo Tools Safety features And Precautions:  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर, 'गुगल नॅनो बनाना' (Google Nano Banana) आणि 'व्हिंटेज साडी एआय' (Vintage Saree AI) या एआय-जनरेटेड फोटोंचे ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. गुगलच्या जेमिनी नॅनो मॉडेलवर आधारित असलेल्या या फोटो-एडिटिंग टूलने सामान्य सेल्फीला आकर्षक थ्रीडी कार्टूनिश पोर्ट्रेटमध्ये रूपांतरित केले आहे. त्याचप्रमाणे, व्हिंटेज साडी ट्रेंडमध्ये महिलांचे फोटो जुन्या बॉलीवूड चित्रपटांमधील नायिकांप्रमाणे पारंपरिक साड्यांमध्ये रूपांतरित केले जात आहेत.

एआयचे फोटो टूल सुरक्षित आहे का? | (How safe is Gemini Nano Banana Photo tool?

हे ट्रेंड खूप आकर्षक असले तरी, आपल्या फोटोंची सुरक्षितता आणि गोपनीयता याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण, एकदा अपलोड केलेले फोटो एआय टूलच्या मदतीने गैरवापर किंवा डीपफेकसाठी वापरले जाऊ शकतात. गुगलने या समस्येवर एक उपाय म्हणून आपल्या जेमिनी २.५ फ्लॅश इमेजमध्ये ‘सिंथआयडी' (SynthID) नावाचे एक अदृश्य डिजिटल वॉटरमार्क टाकले आहे. या वॉटरमार्कचा उद्देश एआय-जनरेटेड कंटेंट ओळखणे हा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे वॉटरमार्क डोळ्यांना दिसत नाही, पण विशिष्ट डिटेक्शन टूल्सच्या मदतीने हे ओळखता येते की फोटो एआयने तयार केलेला आहे.

Google Gemini Trend: ट्रेंडिंग रेट्रो इमेज बनवताना अडचण का येत आहे? काय आहे कारण?

परंतु, या तंत्रज्ञानावर काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'टॅटलर एशिया'च्या अहवालानुसार, या वॉटरमार्कला ओळखणारे डिटेक्शन टूल अजूनही सार्वजनिकपणे उपलब्ध नाही. त्यामुळे सामान्य वापरकर्त्याला हे तपासणे शक्य नाही. तसेच, 'वायर्ड'च्या एका अहवालात एआय डिटेक्शन स्टार्टअप 'रिॲलिटी डिफेंडर'चे सीईओ बेन कोलमन यांनी म्हटले आहे की, हे वॉटरमार्क सहजपणे काढता किंवा त्यात फेरफार करता येतात, त्यामुळे हे तंत्रज्ञान फारसे प्रभावी नाही. या पार्श्वभूमीवर, आपल्या फोटोंची सुरक्षितता कशी राखायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आपले फोटो सुरक्षित कसे ठेवावे: (How to keep your photos safe)

अपलोड करण्याबाबत दक्ष रहा (Be selective about what you upload): कोणत्याही एआय टूलवर संवेदनशील (खासगी किंवा वैयक्तिक माहिती असलेले) फोटो अपलोड करणे टाळा.

Advertisement

मेटाडेटा काढा: फोटो अपलोड करण्याआधी लोकेशन टॅग आणि डिव्हाइस माहिती यांसारख्या मेटाडेटा काढून टाका.

प्रायव्हसी सेटिंग्जचा वापर करा: ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजबूत प्रायव्हसी सेटिंग्ज (Privacy settings) ठेवा.

मूळ प्रती जतन करा (Retain Copies) : मूळ फोटोची एक प्रत नेहमी जतन करून ठेवा.

अटी आणि शर्ती वाचा ( Watch For Term And Consent): फोटो अपलोड करण्याआधी संबंधित ॲप किंवा टूल तुमच्या फोटोचा वापर कसा करणार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

(नक्की वाचा-  Google Gemini Trend : गुगल जेमिनीतून बनवा आतापर्यंतचे सर्वात सुंदर फोटो; हे 10 Prompt नक्की ट्राय करा)