Google Glance ने लाँच केले खरेदीसाठी नवे अ‍ॅप, फोटो अपलोड करुन पाहता येणार तुमच्यासाठी कपडे

Google Glance: गूगलच्या पाठबळाने चालणाऱ्या ग्लान्स या कंपनीने ग्लान्स एआय नावाचा एक खास AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित खरेदीसाठीचा अ‍ॅप लाँच केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

गूगलच्या पाठबळाने चालणाऱ्या ग्लान्स या कंपनीने ग्लान्स एआय नावाचा एक खास AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित खरेदीसाठीचा अ‍ॅप लाँच केला आहे. या अ‍ॅपमध्ये ग्राहक फक्त आपला फोटो अपलोड करून स्वतःवर शोभणारे कपडे आणि लूक पाहू शकतात. हे लूक एआयच्या मदतीने तयार होतात आणि तिथूनच खरेदीही करता येते. पारंपरिक सर्चऐवजी हे अ‍ॅप एक नवा अनुभव आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहेत मुख्य वैशिष्ट्ये?

  • फोटोवरून लगेच स्टाईल पाहता येते
  • तुमच्या त्वचा, शरीरयष्टी आणि शैलीनुसार सुचवलेले कपडे
  • मोबाईल, टीव्ही, अ‍ॅप आणि वेबसाइटवर सहज वापर
  • गोपनीयता आणि डेटा नियंत्रण तुमच्या हातात

हे प्लॅटफॉर्म फोटोरिअलिस्टिक ट्राय-ऑन (ज्यात अवतार मॉडेलिंग आणि एआय-स्टाईल केलेले लूक समाविष्ट आहेत) एकत्रित करून वैयक्तिक खरेदीचा अनुभव देणारे आहे, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला गूगलनेही अमेरिकेत असेच एक उत्पादन लाँच केले होते, जिथे वापरकर्ते कपडे अक्षरशः 'ट्राय' करू शकतात.

( नक्की वाचा : Dating Apps नको रे बाबा! Single तरुणांमध्ये काय आहे नवा ट्रेंड? संशोधनातून कारण उघड )
 

ग्लान्सचे एआय मॉडेल ओपन आर्किटेक्चरवर आधारित आहे, ज्यामध्ये उत्पादक, टेलिकॉम ऑपरेटर आणि ब्रँड्ससोबत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये परस्पर जोडलेले आहे. यामुळे फोन 'एआय फोन'मध्ये, टीव्ही 'घरगुती कॉमर्स डिव्हाइस'मध्ये आणि ब्रँड स्टोअर्स 'एआय शॉपफ्रंट्स'मध्ये बदलले आहेत.

ग्लान्सने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही आठवड्यांत या प्लॅटफॉर्मला 15 लाखांहून अधिक सक्रिय वापरकर्ते मिळाले आहेत. वापरकर्त्यांनी 40 दशलक्षाहून अधिक स्टाईल्सच्या विनंत्या तयार केल्या आहेत, त्यापैकी 50 टक्के वापरकर्त्यांनी त्यांच्या वैयक्तिकृत शैली डाउनलोड केल्या किंवा शेअर केल्या आहेत, तर 40 टक्के वापरकर्त्यांनी खरेदीचा अनुभव घेण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत टॅप केले आहे.  

Advertisement

वापरकर्ते एका क्लिकवर 400 हून अधिक जागतिक ब्रँड्सकडून आणि अनेक ब्रँड्सकडून खरेदी करू शकतात. वापरकर्त्यांच्या डेटावर त्यांचे नियंत्रण राहील, असे आश्वासन  ग्लान्सने दिले आहे.

हे स्वतंत्र  जगभरात गुगल प्ले तसेच ऍपल ऍप स्टोअर, दोन्हीवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड निर्माते आणि टेलिकॉम ऑपरेटर्सचे एकत्रीकरण आहे. सुरुवातीचे मॉडेल फॅशनवर आधारित असले तरी, या वर्षाच्या शेवटपर्यंत सौंदर्य, ऍक्सेसरीज आणि प्रवास यासारख्या श्रेणींमध्ये हाच अनुभव वाढवण्याची योजना असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article