Google Gemini AI Photo Editing Prompts: आपल्याला अनेकदा वाटतं की आपल्या आवडत्या सेलिब्रिटीने आपल्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढावा, मात्र प्रत्यक्षात आपण जेव्हा त्या सेलिब्रिटींसोबत फोटो काढायला जातो तेव्हा त्यांचे सुरक्षारक्षक एकतर आपल्याला फोटो काढू देत नाही, किंवा फोटो काढायला गेल्यास तो फोटो चांगला येत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, यावरही Google Gemini ने तोडगा काढला आहे. ही ट्रीक वापरून तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत एकदम 'कुल' असा फोटो किंवा सेल्फी तयार करू शकाल. गुगल (Google) जेमिनीच्या (Gemini) 'नॅनो बनाना' (Nano Banana) या एआय (AI) फिचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे फिचर इतके जबरदस्त आहे की, तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत एकदम खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या पोलरॉइड (Polaroid) स्टाईलचे फोटो तयार करू शकता.
नक्की वाचा: Google Gemini Trend : गुगल जेमिनीतून बनवा आतापर्यंतचे सर्वात सुंदर फोटो; हे 10 Prompt नक्की ट्राय करा
सोशल मीडियावरही होतायत Google Gemini AI Photo व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम (Instagram) आणि ‘एक्स' (X) या प्लॅटफॉर्मवर असे शेकडो फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात सामान्य लोक आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत रोमँटिक, मजेदार किंवा कॅन्डिड पोजमध्ये दिसत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर ते खरे असावेत असं वाटतं मात्र प्रत्यक्षात हे फोटो एआयने तयार केले आहेत. ‘नॅनो बनाना' हे फिचर वापरणे खूपच सोपे आहे. तुम्हाला फक्त जेमिनी (Gemini) ॲप (app) डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचा फोटो अपलोड करायचाय आणि आणि तुम्हाला हवी असलेली पोझ किंवा ठिकाण प्रॉम्प्टमध्ये (prompt) मध्ये जोडलं की काही सेकंदातच एआय तुमच्यासाठी एक एक मस्त फोटो तयार होईल.
Photo Credit: Gemini AI
खरेखुरे वाटत वाटतात Google Gemini AI Photo ने तयार केलेले फोटो
या फिचरचा वापर करून तयार केलेले फोटो हे इतके सुंदर असतात की ते खरे आहेत असा भास होतो. हा फोटो तयार करताना त्यातले रंग आणि पोतही अगदी नैसर्गिक वाटतात. या फीचरचा वापर करून तुम्ही रोमँटिक डिनर डेटपासून ते पार्टीमधील डान्स स्टेप्सपर्यंत कोणत्याही क्षणाचे फोटो तयार करू शकता. अनेक युझर्सनी त्यांचे फोटो थेट हॉलीवूड स्टार्ससोबत तयार केले आहेत, जे पाहून लोकांना आश्चर्य वाटतंय. या ट्रेंडमुळे सोशल मीडियावर सध्या गदारोळ माजला असून लोकं आपली क्रिएटीव्हिटी वापरून नवनवे फोटो तयार करतायत.
नक्की वाचा: Gemini Photo prompts For Men: मुलांसाठी 15 जबरदस्त प्रॉम्प्ट! कॉपी करा अन् तुमच्या फोटोला द्या स्टायलिश लूक
‘नॅनो बनाना' (Nano Banana) हे फिचर तुमच्या सामान्य फोटोला अल्ट्रा-रिअलिस्टिक (ultra-realistic) आणि 4D-स्टाईल पोर्ट्रेटमध्ये (portraits) बदलवते. या फिचरमुळे पोलरॉइड (Polaroid) स्टाईलचे फोटो तयार करण्याचा ट्रेंड सध्या जोरदार सुरू आहे. हे फोटो इतके खरे दिसतात की, तुम्ही खरोखरच त्या क्षणी सेलिब्रिटींसोबत आहात, असे वाटते.
Photo Credit: Gemini AI
हे फिचर वापरण्यासाठी फक्त 5 सोप्या स्टेप्स (steps) फॉलो करायच्या आहेत.
1. तुमच्या मोबाईलवर जेमिनी ॲप डाउनलोड करा.
2. तुमच्या गुगल अकाऊंटने लॉग इन करा.
3. तुमचा आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचा फोटो अपलोड करा.
4. तुम्हाला जसा फोटो हवा आहे, तशी प्रॉम्प्ट (prompt) लिहा. जर प्रॉम्प्ट माहिती नसेल तर खाली दिलेल्या प्रॉम्टचा तुम्ही वापर करू शकता. जर तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायची असेल तर त्यात, “क्रिएट अ 4K एचडी रियलिस्टिक पोलरॉइड-स्टाईल फोटोग्राफ…ॲड स्लाईट ब्लर अँड कंसीस्टंट लाईटिंग...” अशा सूचनांचा समावेश करू शकता.
5. सेंड बटण दाबून फोटो तयार करा, आणि नंतर तो डाउनलोड (download) करून लगेच शेअर करा!
या प्रॉम्प्टचा वापर करा आणि मिळवा सेलिब्रिटींसोबत भन्नाट फोटो
1. कॅफेमधील आनंदी क्षणाच्या फोटोसाठी (Cafe Candid Moment AI Prompt)
Create a 4K HD realistic polaroid-style photograph of the people in the provided images. They are seated at a rustic wooden table inside a cozy, sunlit cafe with bookshelves in the background. They are laughing candidly, sharing a joyful moment. Keep the faces unchanged. Add soft, warm natural lighting from a large window and a subtle blur (bokeh effect) to the background. Enhance the photo with a warm, nostalgic feel, a hint of film grain, and a slightly overexposed white border, capturing a sweet, unguarded moment in a classic film photo style.
2. गोल्डन अवरमधील सुंदर फोटो (Golden Hour Outdoor Shot AI Prompt)
Create a 4K HD hyper-realistic polaroid-style snapshot of the people in the uploaded images. They are walking together down a tree-lined park path during golden hour. Keep the uploaded individuals' faces unchanged. Capture the glow of the warm, setting sun on their faces, adding a gentle lens flare. Introduce a slight cinematic blur and a small vignette effect to draw focus to the subjects. The overall feel should be serene and joyful, resembling a classic, cherished instant film photograph.
3. रात्रीच्या वेळी शहरी भागातील छान फोटो (Urban Nighttime Photograph AI Prompt)
Create a 4K HD ultra-realistic polaroid-style photograph of the uploaded individuals. They are standing under a vintage streetlamp at night, with a distant, blurred cityscape in the background. Keep the faces unchanged. Render the image in high-contrast black and white with a prominent film grain. Use dramatic, moody lighting from the streetlamp to cast long shadows and create stark highlights. The final image should have a gritty, artistic feel, capturing a powerful and unique moment on monochrome film.
4. सकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरील फोटो (Sunrise Beach Photo Gemini AI Prompt)
Create a 4K HD realistic polaroid-style image of the people in the provided images. They are standing at the edge of a calm beach, watching the sunrise. Keep the faces unchanged. The lighting should be soft and diffused morning light, with gentle pastel colors of pink and orange in the sky. Add a dreamy, soft-focus effect with a gentle film grain. The scene should evoke a peaceful, serene emotion, with the classic white border completing the nostalgic film photo look.
5. पार्टीमधील जबरदस्त फोटो (Vibrant Party Gemini AI Photo Prompt)
Create a 4K HD realistic polaroid-style photograph of the people in the uploaded images. They are in a festive indoor party setting with colorful neon lights and blurred figures dancing in the background. Keep the uploaded faces unchanged. The lighting should be dynamic and vibrant, with cool tones from the neon lights creating a striking effect. Add a motion blur to the background and a slight lens distortion to capture the energy of the moment. The overall photo should be lively and energetic, with a raw, documentary-style film aesthetic.