Gudi Padwa 2026: भारतीय संस्कृतीतील सण केवळ परंपरा नसून त्यामागे सखोल वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित विचार दडलेले असतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा हे याचे उत्तम उदाहरण आहे. या दिवशी आपण केवळ विजयाची गुढी उभारत नाही, तर कडुलिंब, गूळ, जीरे, ओवा आणि मीठ यांचा समावेश असलेल्या विशेष प्रसादाचे सेवन करतो. हा प्रसाद म्हणजे निसर्गाचं आपल्याला दिलेलं एक हेल्थ टॉनिक आहे. वसंत ऋतूच्या आगमनाने वातावरणात उष्णता वाढू लागते, अशा वेळी शरीराला थंडावा आणि अंतर्गत शुद्धीकरणाची (Detox) गरज असते. कडुलिंबाच्या पानांमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, तर गूळ आणि साखर गाठींमुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. हा प्रसाद म्हणजे गोड, कडू आणि तिखट अशा चवींचे मिश्रण असून तो शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन राखतो. या लेखाद्वारे डॉ मानसी धामणकर यांनी गुढीपाडव्याच्या प्रसादाचे आरोग्यदायी महत्त्व आणि गुढी उभारण्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन सविस्तरपणे जाणून घेऊया...
गुढीपाडव्याचा प्रसाद आणि आरोग्यदायी फायदे | Gudi Padwa 2026 Prasad Significance
गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2026) हा विशेष प्रसाद म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून ते एक उत्तम हेल्थ टॉनिक आहे. चैत्र महिन्यात कडक ऊन पडायला सुरुवात होते. अशा वेळी शरीराला थंडावा आणि शुद्धीकरणाची गरज असते.
कोणत्या गोष्टींपासून तयार केला जातो प्रसाद?
कडुलिंबाची पाने, गूळ, जीरे, ओवा आणि मीठ
- जीरे : ओवा पचनाला मदत करते.
- मीठ : इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स करते.
- कडुलिंबाची पाने: हे उत्तम अँटी-बॅक्टेरिअल आहेत, ते रक्त शुद्ध करतात आणि त्वचेचे विकार दूर ठेवतात.
- गूळ: गुळामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि लोहाची कमतरता भरून निघते.
या मिश्रणातून आपल्याला कडू, गोड आणि तिखट अशा चव मिळतात. जे शरीरातील त्रिदोष वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करतात.
गुढी का उभारतात?गुढी उभी करणे हे विजय आणि समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण गुढीच्या वरील टोकावर कलश पालथा घालतो. तेव्हा त्यामागे एक विशेष शास्त्रीय आणि पौराणिक विचार आहे.
(नक्की वाचा: Gudi Padwa 2026: डॉ अपर्णा बांदोडकरला अशी मिळाली बुलेट राणी म्हणून ओळख, यंदाच्या सरप्राइज लुककडे सर्वांचं लक्ष)
विजयाचे प्रतीक: प्राचीन काळी जेव्हा एखादा राजा युद्ध जिंकून परत यायचा, तेव्हा विजयाचे प्रतीक म्हणून उंच ध्वज उभारला जायचा. गुढीवरील पालथा तांब्या हा त्या विजयाचा कळस दर्शवतो.
ऊर्जा ग्रहण करणे: तांब्याच्या कलशाचे तोंड खालच्या दिशेला असल्यामुळे तो अवकाशातील सात्विक लहरी तसेच ब्रह्मांडीय ऊर्जा खेचून घेतो आणि ती गुढीच्या काठीद्वारे खाली प्रवाहित करतो. ज्यामुळे घराभोवतीचे वातावरण शुद्ध होते, असे मानले जाते.
गुढीला साखरेची गाठी बांधली जाते. या गाठी पांढऱ्या शु्भ्र रंगाची आणि गोड असते. कडू कडुलिंब आणि ही गोड गाठी एकत्र असण्यामागे जीवनाचा मोठा एक धडा आहे. हे स्वीकारण्यासाठी की आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येतात.
(नक्की वाचा: Amavasya March 2026 Date & Time: गुढीपाडव्याला अमावस्या आहे? जाणून घ्या अचूक तारीख, तर्पण-श्राद्धाची योग्य वेळ)
बत्तासे का ?
खरेतर गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाचा काळ असतो. या काळात हवामान बदलत असते आणि उन्हाची तीव्रता वाढू लागते. बत्तासे आणि साखरेची गाठी वापरण्यामागची काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत.
- ऊर्जेचा स्त्रोत: कडक उन्हामुळे शरीरातील साखर कमी होऊन थकवा जाणवू शकतो.
- साखर (बत्तासे) खाल्ल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
- पित्तशामक: आयुर्वेदानुसार खडीसाखर किंवा साखरेचे पदार्थ अंगातील उष्णता कमी करण्यास आणि पित्त शांत करण्यास मदत करतात.
- प्रसन्नता नवीन वर्षाची सुरुवात गोड व्हावी, हे तर आहेच पण साखरेचे पांढरे शुभ्र स्वरुप मनाला प्रसन्नता आणि सात्विकता देते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world