Hair Oil Faster Growth Tips: केसांची भराभर वाढ करणाऱ्या तेलाचा शोध तुम्हीही घेताय का. एक महिन्यात केस लांबसडक कसे होतील, केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी काय करावे यासह केसांच्या अन्य समस्यांपासून तुम्हालाही सुटका हवीय. या लेखाद्वारे आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.लहानपणी आई, आजीने केलेली केसांची चंपी तुम्हाला आठवतेय का? त्यावेळेस तुम्हाला कदाचित कंटाळा येत असेल पण मसाजमुळे डोक्याला किती आराम मिळायचा, हे तुम्हाला नव्याने सांगायची आवश्यकता नाही. दरम्यान केस कोरडे आणि निर्जीव असतील तरच केसांना तेल लावण्याची आवश्यकता असते, असा बहुतांश लोकांचा गैरसमज आहे. पण केसांना ओलावा मिळावा तसेच केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा व्हावा यासाठीही केसांना तेल लावणं आवश्यक आहे.
सर्व प्रकाराच्या केसांसाठी तेल लावणं आवश्यक आहे का?
महिन्याभरात केस लांबसडक व्हावे, अशी तुमची इच्छा असेल तर जाणून घेऊया सविस्तर माहिती...
- पातळ आणि छोटे केस : जर तुमचे केस पातळ असतील किंवा लांबी अधिक नसेल तर तेलामुळे केसगळती कमी होईल आणि केसांची वाढही होईल.
- कुरळे केस : तेलामुळे कुरळ्या केसांचा गुंता कमी होण्यास मदत मिळेल.
- लांबसडक केस : तुम्हाला लांबसडक केस हवे असल्यास वेळोवेळी स्प्लिट एंड कापणं आवश्यक आहे.
- तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तेलाची निवड करावी.

Photo Credit: Pexels
केसांना तेल लावण्याचे फायदे (Benefits of Hair Oiling)
- ओलावा : तेलामुळे केसांना ओलावा मिळतो, ज्यामुळे केस दीर्घकाळासाठी हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.
- केस मजबूत होतील : तेलामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो, जे केसांसाठी सुपरफुडप्रमाणे कार्य करते. स्कॅल्प मसाजमुळे मुळांमधील विषारी घटक बाहेर पडतात आणि केस मजबूत होतात.
- केस मऊ होतील : तेल केसांच्या आतपर्यंत जाते, ज्यामुळे केस मऊ राहण्यास मदत मिळते.
- कोंडा कमी होईल : कोरड्या स्कॅल्पच्या समस्येमुळे कोंड्याची समस्या उद्भवते, तेलाने मसाज केल्यास कोंड्याची समस्या दूर होईल.
- केसांची वाढ होईल: स्कॅल्प निरोगी असल्यास केसांचे तुटणे कमी होईल आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळेल.
- उष्णता आणि सूर्यापासून संरक्षण: ड्रायर, स्ट्रेटनर यासारखी स्टायलिंग टुल तसेच सूर्यकिरणांपासून केसांचे संरक्षण होईल.
- नैसर्गिक चमक: प्रदूषण आणि स्टायलिंगमुळे केसांची चमक कमी होते. तेलातील फॅटी अॅसिड्समुळे केसांना चमक मिळते.

आठवड्यातून केसांना किती वेळा तेल लावावे, हे पूर्णतः तुमच्या केसांच्या गरजांवर अवलंबून आहे.
- जर तुम्ही केवळ केसांच्या टोकांना तेल लावत असाल तर नियमित हा उपाय करू शकता.
- केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर आठवड्यातून एक-दोन वेळा हा उपाय करणं पुरेसे ठरेल.
- केस चिकट होत असतील तेलाचा वापर कमी करावा, केस कोरडे वाटत असतील तर योग्य प्रमाणात तेल लावावे.
(नक्की वाचा: Benefits Of Eating Almonds: बदाम किती तास पाण्यात भिजत ठेवावे, बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?)
केसांची वाढ होण्यासाठी कोणते केस चांगले? Best Hair Oils- आर्गन ऑइलला (Argan Oil) 'लिक्विड गोल्ड' असे म्हणतात. हे तेल हलके असते, यामुळे कोरड्या आणि गुंतलेल्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
- जोजोबा ऑइल (Jojoba Oil) केसांच्या क्युटिकलपर्यंत जाऊन केसांना ओलावा देण्याचे काम करते.
- मनकेटी ऑइलमध्ये (Manketti Oil) प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केसांचे तुटणे कमी होते.
- एरंडेल तेलामुळे (Castor Oil) स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया वाढून केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळेल.
- नारळाचे तेल (Coconut Oil) केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. पण कुरळ्या केसांवर जास्त प्रमाणात वापरल्यास केस कडक होऊ शकतात.
- ऑलिव्ह ऑइलमुळे (Olive Oil) केसांना चमक मिळते.
- बदामाच्या तेलामुळे (Almond Oil) केसांना ओलावा मिळतो आणि केसांचे गळणे कमी होते.
पहिली पद्धत: केसांना रात्रभर तेल लावून ठेवावे
1. सर्वप्रथम केसांना कंगवा करून घ्यावा.
2. बोटांनी किंवा स्कॅल्प मसाजरच्या मदतीने तेल मसाज करावा.
3. केस टॉवेल किंवा कॅपने झाकून झोपा आणि सकाळी उठल्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे.
दुसरी पद्धत : स्टायलिंगदरम्यान थोड्याशा प्रमाणात तेल लावणे
1. एका स्प्रे बॉटलमध्ये पाण्यात नारळ तेल, लॅव्हेंडर ऑइल आणि व्हिटॅमिन ई मिक्स करा.
2. ओलसर किंवा कोरड्या केसांवरही हे मिश्रण स्प्रे करू शकता. यामुळे केसांना लगेचच चमक येईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
