तुम्ही जास्त दारू घेतलीय, हँगओव्हर उतर नाही? मग हे 7 घरगुती उपाय करा, नक्की मिळेल आराम

हँगओव्हर हा कोणताही आजार नाही. तर शरीराचा एक संदेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Hangover Home Remedies: कधीतरी मित्रांसोबत पार्टीत दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे किंवा मन खराब झाल्यासारखं वाटलं तर समजा तुम्हाला हँगओव्हर झाला आहे. हे असं का होतं? कारण दारूमुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी होते. म्हणूनच डोकेदुखी, तहान, थकवा, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा अशी हँगओव्हरची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी हा हँगओव्हर कसा उतरवता येईल याचे काही घरगुती उपाय आहेत. त्याचीच माहिती आपण आज करून घेणार आहोत. त्यामुळे तुमचा हँगओव्हर कमी होण्यास नक्की मदत होणार आहे. 


हँगओव्हरची कारणे  (lifestyle tips for hangover)

  • रिकाम्या पोटी दारू पिणे: यामुळे दारूचा परिणाम लवकर होतो.
  • कमी पाणी पिणे: दारूमुळे शरीरातील पाणी कमी होते.
  • जास्त दारू पिणे: यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते.
  • हँगओव्हरची लक्षणे (lifestyle tips for hangover)
  • डोकेदुखी आणि डोळ्यांची जळजळ.
  • खूप जास्त तहान लागणे.
  • अंगदुखी आणि थकवा.
  • चिडचिडेपणा आणि अस्वस्थता.
  • अपुरी झोप.

हँगओव्हरपासून सुटका मिळवण्याचे घरगुती उपाय

  • लिंबू पाणी: थंड पाण्यात लिंबू आणि थोडं मध मिसळून प्या. यामुळे शरीरातील साखरेची पातळी (sugar level) संतुलित होते. शिवाय नशा उतरण्यास मदत होते.
  • नारळाचे पाणी: हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रिंक आहे. जास्त नारळ पाणी प्या, लगेच आराम मिळेल.
  • पुदिन्याचा चहा: पुदिन्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्याने गॅस, उलटी आणि अस्वस्थतेमध्ये आराम मिळतो.
  • आले आणि काळं मीठ: आल्याच्या तुकड्यावर काळं मीठ टाकून खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या थांबतात.
  • टोमॅटोचा रस: टोमॅटोमध्ये असलेले फ्रुक्टोज अल्कोहोलला कमी करते आणि शरीराला ताजेतवाने बनवते.
  • मध: मधामध्ये असलेले नैसर्गिक साखरेचे घटक दारूचे हानिकारक परिणाम कमी करतात.
  • केळं आणि सफरचंद: पोटॅशियम आणि फायबर शरीराला ऊर्जा देतात आणि पोटाला आराम देतात.

हँगओव्हरच्या वेळी काय करावे

  • पुरेशी झोप घ्या.
  • हलकं आणि पौष्टिक जेवण करा.
  • थंड पाण्याने अंघोळ करा.
  • आरामदायक गाणी ऐका.

हँगओव्हर हा कोणताही आजार नाही. तर शरीराचा एक संदेश आहे. थोडी समजदारी आणि हे घरगुती उपाय वापरल्यास तुम्ही यावर सहज नियंत्रण मिळवू शकता. तुमचं आयुष्य पुन्हा सामान्य करू शकता.