Happy Republic Day 2026 Wishes Quotes: प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि देश एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला. हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्यासाठी नसून संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्य आणि मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून घडलेले संविधान देशाच्या एकतेचा, समतेचा आणि बंधुतेचा पाया आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा देतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त मित्रपरिवार, कुटुंबीयांसह प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | प्रजासत्ताक दिन 2026| Happy Republic Day 2026 Wishes Quotes
1. आपल्या संविधानाने दिलेले हक्क
कर्तव्य आणि स्वातंत्र्य जपत आपण
एक सशक्त, समृद्ध आणि एकसंघ भारत घडवूया
जय हिंद!
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2. भारतीय संविधान ही आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे
त्याचे मूल्य जपून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊया
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
3. आजचा दिवस आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा आणि लोकशाहीचा आहे
संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून
भारताला नव्या उंचीवर नेऊया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
4. संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवत
एकता, समता आणि बंधुता जपूया
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशासाठी
काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
5. भारताच्या संविधानाने आपल्याला ओळख दिली
अधिकार दिले आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली
या अभिमानास्पद दिवशी सर्व भारतीयांना
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6. लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय
या मूल्यांवर उभा असलेला
आपला भारत सदैव प्रगतीपथावर राहो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | Prajasattak Din 2026 Shubhechha Sandesh
7. प्रजासत्ताक दिन हा फक्त उत्सव नसून
जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे
चला, संविधानाचा सन्मान करूया
देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
8. तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
9. आपल्या देशाची ओळख म्हणजे विविधतेत एकता
संविधानाच्या मार्गावर चालत
आपण भारताला अधिक बलवान बनवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
10. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाने
दिलेल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही आठवण ठेवूया
एक जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
12. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून घडलेले संविधान
आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
13. लोकशाहीचा उत्सव साजरा करताना
देशहित प्रथम ठेवूया
संविधानाच्या मूल्यांवर ठाम राहूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
14. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या
गौरवशाली इतिहासाची
उज्ज्वल भविष्यासाठीच्या
संकल्पाची आठवण करून देतो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
15. संविधानामुळेच आपण सर्व समान आहोत
या समतेचा आदर करत
शांत, प्रगत आणि समृद्ध भारत घडवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
16. भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत राहो
संविधानाची मूल्ये सदैव जिवंत राहोत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
17. आजचा दिवस आपल्याला एक जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा देतो.
चला, देशासाठी सकारात्मक बदल घडवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
(नक्की वाचा: Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार, यंदाची थीम गणेशोत्सव)
18. संविधान हे केवळ पुस्तक नाही
तर आपल्या लोकशाहीची श्वासवाहिनी आहे
त्याचा सन्मान राखूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
19. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने
देशाच्या एकतेसाठी, शांततेसाठी
आणि प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
20. स्वतंत्र भारताचे संविधान
हे आपल्या भविष्याचा पाया आहे
या पायावर मजबूत भारत उभारूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)