Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे काय? 7 दिवसांत दिसेल 'हा' फरक

लसणाची चव उग्र असल्याने सुरुवातीला अर्धी पाकळी खावी आणि नंतर हळूहळू प्रमाण वाढवावे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कच्च्या लसणाची नियमित सेवन केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात
  • लसूण कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे
  • उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी लसूण रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Raw Garlic Benefits: वैज्ञानिक दृष्टिकोनातून लसणाचे महत्त्व फार मोठे आहे. स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेला लसूण केवळ चवीसाठीच नाही, तर औषधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो. विशेषतः सलग 7 दिवस रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी चघळून खाल्ल्यास शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. लसणामध्ये असलेले 'अॅलिसिन' हे घटक नैसर्गिक रक्षक म्हणून काम करतात, असे अनेक संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे.

आरोग्यावर याचे वेगवेगळे फायदे आहेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रण होण्यास मगत होते.  चुकीच्या आहारशैलीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. लसणाचे नियमित सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. या शिवाय  रक्तदाबावर नियंत्रण ही मिळवता येते. हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण हा एक प्रभावी उपाय आहे. हे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करून रक्तभिसरण सुरळीत राखण्यास मदत करते. 

नक्की वाचा - Long Life Tips: दीर्घायुषी होण्याचा सोपा फॉर्म्युला! रोज 'या' दोन गोष्टी करा अन् दीर्घायुषी व्हा

लसूण खाण्याचने सांधेदुखीवर ही आराम मिळतो. लसणामध्ये दाहशामक (Anti-inflammatory) गुणधर्म असतात, जे अर्थरायटिस किंवा सांधेदुखीमुळे येणारी सूज कमी करण्यास साहाय्यक ठरतात. लसणाचा उग्र वास कमी करण्यासाठी तो थोडा वेळ पाण्यात भिजवून किंवा त्याचे बारीक तुकडे करून खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा लसूण आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ला, तर तुमचे शरीर आतून स्वच्छ आणि निरोगी होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य राखण्यापासून ते त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत लसूण कमालीचा फायदेशीर आहे.

नक्की वाचा - Korean Skin: '4-2-4' कोरियन स्किन केअर रूटीनचे करा पालन अन् घरगुती उपायातून मिळवा कोरियन ग्लास स्किन

काय होतात फायदे?

हृदय राहील तरुण: 

  • रक्तातील घाण साफ करून कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद लसणात आहे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

पिंपल्सपासून सुटका: 

  • लसणामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे (Acne) आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन त्वचा फ्रेश दिसते.

बीपी राहील नॉर्मल: 

  • ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी कच्चा लसूण औषधासारखे काम करतो.

लसणाची चव उग्र असल्याने सुरुवातीला अर्धी पाकळी खावी आणि नंतर हळूहळू प्रमाण वाढवावे. यामुळे आरोग्याला मिळणारे फायदे थक्क करणारे आहेत.