Benefits Of Milk and Honey: आरोग्याचा खजिना बहुतांश वेळेस आपल्या किचनमध्येच असतात, असे आपण अनेकदा तज्ज्ञमंडळींकडून ऐकले असेल. दूध आणि मध हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. दोन्ही गोष्टी एकत्रित करुन प्यायल्यास शरीराला संपूर्ण पोषण मिळते, असे म्हणतात. आयुर्वेदापासून ते कित्येक रीसर्चमधील माहितीनुसार, दूध आणि मधामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यासह शरीराला ऊर्जा मिळते आणि मानसिक शांतताही लाभते.
रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होणे आणि तणाव कमी होणे (Milk And Honey Health Benefits)
दुधातील कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन तर मधातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. तसेच तणाव कमी होण्यासह मज्जासंस्थेसही असंख्य लाभ मिळतात.
झोप आणि पचनप्रक्रियेसाठी लाभदायक
झोप न येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मध आणि दूध एकत्रित पिणे लाभदायक ठरू शकते. रात्री झोपण्याच्या तासाभरापूर्वी मधयुक्त दूध प्यायल्यास गाढ झोप लागू शकते. अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाशी संबंधित समस्यांमुळे सुटका मिळू शकते. कारण यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
हाडे, मेंदू आणि ऊर्जा (Immunity Booster Drink)
दूध आणि मधामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. संधीवातासारख्या समस्यांचा धोका कमी होईल. मेंदूचे आरोग्याही सुधारेल आणि थकाव दूर होऊन शरीरास ऊर्जा मिळेल. शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहील.
पुरुषांसाठी फायदेशीर
दूध आणि मधामुळे पुरुषांच्या आरोग्यास विशेष फायदे मिळतील. या पेयामुळे पुरुषांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्त्राव वाढण्यास मदत मिळेल. तसेच प्रोस्टेट कॅन्सराचाही धोका कमी होऊ शकतो.
डोळे आणि श्वसनप्रणालीसाठी लाभदायक
मध आणि दुधामुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळेल. तसेच कफ, दमा आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळेल. शारीरिक तसेच मानसिक ताणतणावही कमी होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )