Health News: लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांसाठी कोणतं जीवनसत्व महत्वाचं? डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

जर व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर वेळीच उपचार झाले नाहीत, तर या समस्यांमुळे कायमस्वरूपी शारीरिक नुकसान होऊ शकतं.

जाहिरात
Read Time: 3 mins

लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांसाठी कोणतं जीवनसत्व महत्वाचं या प्रश्नाचं उत्तर बी 12 हे आहे.  बी 12  जीवनसत्त्व शरीरातल्या लाल पेशींची संख्या नियमित ठेवायला मदत करतं. शरीरातल्या अवयवांकडे ऑक्सिजन घेऊन जायचं महत्त्वाचं काम लाल पेशी करतात. बी 12  हे जीवनसत्त्व कोबालामिन म्हणूनही प्रसिद्ध आहे. 'बी' समूहातलं हे एक महत्त्वाचं जीवनसत्त्व बहुतेकवेळा प्राणीजन्य आहारातच सापडतं. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने 2020 मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार, जन्मल्यापासून 3 वर्षे वयापर्यंत जेवणात 1.2 मायक्रोग्रॅम्स इतक्या बी 12 जीवनसत्त्वाची गरज असते असं डॉ. कुशल बांगर सांगता. डॉ. बांगर हे डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटल मध्ये इंटेन्सिव्हिस्ट आणि जनरल फिजिशियन आहेत.  

बी 12 ची कमतरता झाल्यास दिसणारी लक्षणे

मज्जासंस्थेच्या आणि लाल रक्त पेशींच्या विकासासाठी बी 12 जीवनसत्त्व महत्त्वाचं असल्याने त्याच्या कमतरतेचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

  • - सतत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे
  • - चक्कर येणे किंवा डोकेदुखी
  • - हात-पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे
  • - स्मरणशक्ती कमजोर होणे, मन एकाग्र करण्यात अडचणी येणे
  • - सततचा चिडचिडेपणा, मूड स्विंग्ज
  • - त्वचा पिवळसर पडणे
  • - जीभेला सूज येणे किंवा लालसर दिसणे 
  • - भूक मंदावणे आणि पचनासंबंधी समस्या 

शरीराला गरजेचे आहे बी 12 
लाल रक्तपेशी (RBC) तयार करण्यासाठी, मेंदू आणि नर्व्ह सिस्टिम योग्यरित्या चालण्यासाठी, शारीरीक उर्जा वाढविण्यासाठी  तसेच थकवा दूर करण्यासाठी, डिएनए तयार होण्यासाठी बी 12  गरजेचे आहे. हे एखाद्याच्या शरीरातील हार्मोनल संतुलन राखणे आणि रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठी मदत करते.

सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी गरजेचे
महिलांमध्ये हार्मोनल संतुलन, मासिक पाळीचे चक्र नियमित ठेवणे आणि गर्भधारणेदरम्यान बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते. पुरुषांमध्ये हे शुक्राणुंची गुणवत्ता आणि उर्जा टिकवण्यासाठी मदत करते. मुलांमध्ये मेंदूची विकासात्मक वाढ, एकाग्रता आणि शारीरिक विकासासाठी गरजेचे ठरते.

काय कराल घरगुती उपाय
आहारातील बी 12 चे स्त्रोत - दूध, दही, पनीर,अंडी, चीज, सोयाबीन उत्पादनं (सोया मिल्क, टोफू),मशरूम
मोड आलेले कडधान्ये (sprouts) आहारात यांचा समावेश करा. त्याचा तुम्हाला फायदा होईल. रोज एक ग्लास दूध, आठवड्यातून 2 ते 3 वेळा पनीर किंवा दही, हिरव्या भाज्या आणि तृणधान्य आहारात घ्या. 

Advertisement

बी 12 ची कमतरता भरून काढणारी औषधे / सप्लिमेंट्स
जर रक्त तपासणीत बी 12 ची कमतरता आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने खालीलपैकी उपचारांचा अवलंब करा.

बी 12 पातळी वाढविणारी औषधं, इंजेक्शन 
मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्स ज्यात B12, B6 आणि फॉलिक ऍसिड असते.(ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत).

बी 12 ची कमतरता होऊ नये यासाठी काय कराल?

  • नियमितपणे प्रथिनयुक्त व संतुलित आहाराचे सेवन करणे
  • जंक फूड आणि प्रोसेस फूडचे सेवन टाळा. 
  • शाकाहारी असल्यास वेळोवेळी बी 12 तपासणी करून आवश्यक सप्लिमेंट्स घ्या.
  • पुरेसे पाणी प्या आणि झोप पूर्ण घ्या.
  • शरीर सक्रिय ठेवा आणि व्यायाम करा.
  • जर व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर वेळीच उपचार झाले नाहीत, तर या समस्यांमुळे कायमस्वरूपी शारीरिक नुकसान होऊ शकतं.