5 Healthy Breakfast: नाश्ता (breakfast) हे आपल्या दिवसातील सर्वात महत्त्वाचे अन्न आहे. त्यामुळे नाश्त्यामध्ये नेहमी आरोग्यदायी गोष्टींचा समावेश केला पाहिजे. नाश्त्यामध्ये तुम्ही प्रथिने (प्रोटीन), फायबर, चांगले फॅट्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (मिनरल्स) यांनी युक्त पदार्थांचा समावेश करावा. शरीराला दिवसभर ऊर्जा आणि पोषण मिळावे यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये फळे, धान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर पौष्टिक पदार्थ खाऊ शकता. चला तर मग, अशाच काही आरोग्यदायी खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्यांना तुम्ही नाश्त्यात समाविष्ट करू शकता. शिवाय त्यामुळे फिट अँण्ड फाईन राहू शकता.
1. अंडी:
अंडी प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये अंडी खाणे उत्तम मानले जाते. तुम्ही अंड्याचे वेगवेगळे पदार्थ नाश्तामध्ये खाऊ शकता.
2. मूग डाळ डोसा:
मूग डाळीचा डोसा पोषक तत्वांनी भरलेला असतो. तो एक आरोग्यदायी नाश्त्याचा पर्याय आहे. तुम्हाला काहीतरी आरोग्यदायी खायचे असेल तर मूग डाळीचा डोसा हा चांगला पर्याय आहे.
3. पनीर पराठा:
पनीर पराठा चवीला उत्तम असतो. आरोग्यासाठीही चांगला असतो. तुम्ही नाश्त्यामध्ये त्याचा समावेश करू शकता. पनीरमध्ये प्रथिने आणि भरपूर पोषण असल्यामुळे ते फायदेशीर मानले जाते.
4. पोहे:
पोहे हा एक लोकप्रिय भारतीय नाश्ता आहे. हा हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा असतो. पोहे अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी तुम्ही त्यात भाज्या आणि मसाले घालू शकता.
5. इडली:
इडली हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. जो तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. इडली तांदूळ आणि उडीद डाळीच्या मिश्रणातून (batter) बनवली जाते. ती मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट असते. इडली बहुतेक वेळा सांबार आणि चटणीसोबत खाल्ली जाते.