Health News: पूर्ण झोपेनंतरही येतोय थकवा? याकडे दुर्लक्ष करु नका, नाही तर 'हे' गंभीर आजार घालतील विळखा

या सर्व उपचारांचा एकत्रित परिणाम म्हणून पेशींचे आरोग्य सुधारते, पुनर्प्राप्तीचा वेग वाढतो आणि जीवनमान अधिक चांगले होण्यास मदत मिळते.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सेल्युलर फटीग म्हणजे शरीरातील पेशी योग्य प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्यात अपयशी ठरल्यामुळे सतत थकवा जाणवणे
  • मायटोकॉन्ड्रिया पेशींमधील ऊर्जा निर्माण करणाऱ्या घटकांच्या कार्यक्षमतेत घट झाल्याने सेल्युलर फटीग होते
  • दीर्घकालीन तणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार आणि वाढती वय मायटोकॉन्ड्रियाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का? कामच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच तरतरीत राहण्यासाठी कॉफीची गरज भासते का? असे असल्यास तुम्ही एकटे नाही. बऱ्याचशा  व्यक्तींमध्ये सततच्या थकव्याचे कारण हे वाढते वय, कामाचा ताण किंवा व्यस्त जीवनशैली असून शकते. या समस्येचे मूळ कारण आपल्या शरीरातील पेशींमध्ये दडलेले आहे. याबाबत रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. ते आपण पाहणार आहोत. 

'सेल्युलर फटीग'(Cellular Fatigue) म्हणजे काय?
जेव्हा शरीरातील पेशी दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा ‘सेल्युलर फटीग' म्हणजेच पेशींसंबंधी थकवा निर्माण होतो. हे प्रामुख्याने पेशींमधील ऊर्जा निर्माण करणाऱ्या मायटोकॉन्ड्रिया (Mitochondria) या घटकांच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे घडते. दीर्घकालीन तणाव, अपुरी झोप, संतुलित आहाराचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढते वय या कारणांमुळे मायटोकॉन्ड्रियाचे आरोग्य बिघडते. परिणामी शरीरातील ऊर्जानिर्मिती कमी होते आणि सतत थकवा, मेंदूची कार्यक्षमता मंदावणे (ब्रेन फॉग), एकाग्रतेचा अभाव, शारीरिक शक्ती कमी होणे तसेच दुखापत किंवा आजारातून बरे होण्यास अधिक वेळ लागणे अशी लक्षणे दिसू लागतात.

Advertisement

नक्की वाचा - World Brain Tumour Day 2026: सावधान! 'ही' 5 लक्षणे दिसली तर असू शकतो भयंकर ब्रेन ट्यूमर, 5 वा संकेत जीवघेणा

आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम
सेल्युलर फटीगकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मधुमेह, हृदयरोग, क्रॉनिक फटीग सिंड्रोम, न्यूरोडिजेनेरेटिव्ह विकार, स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) आजार, नैराश्य आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो. याचा थेट परिणाम एखाद्याचे आरोग्य, कार्यक्षमता आणि जीवनमानावर होतो. पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये थकवा, वेदना, झोपेच्या समस्या किंवा मूडमधील बदल यांसारख्या लक्षणांवर औषधे आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा उपायांमुळे काही प्रमाणात तात्पुरता आराम मिळू शकतो. परंतु पेशी आणि मायटोकॉन्ड्रियातील बिघाड या मूळ कारणांवर त्यांचा मर्यादित परिणाम होतो.

आधुनिक उपचारांची भूमिका
स्टेमआरएक्समध्ये (StemRx) सेल्युलर फटीगच्या व्यवस्थापनासाठी मायक्रोडोस इन्फ्युजन (MDI) थेरपी, NAD+ थेरपी, एक्सोसोम थेरपी, रेड लाईट थेरपी, फिजिओथेरपी आणि पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) यांसारख्या प्रगत उपचारपद्धतींचा वापर केला जातो. मायक्रोडोस इन्फ्युजन थेरपी मायटोकॉन्ड्रियाचे कार्य सुधारण्यास मदत करते, तर NAD+ थेरपी ऊर्जानिर्मिती आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या रेणूंची पातळी पुनर्संचयित करण्यास मदत करते. एक्सोसोम थेरपी पेशींमधील संवाद आणि ऊतींच्या दुरुस्ती प्रक्रियेला चालना देते. यासोबत फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचारांमुळे शारीरिक ताकद, हालचाल क्षमता आणि सहनशक्ती वाढण्यास मदत होते.

नक्की वाचा - Cancer Alert: फक्त 3 सवयी बदला आणि कॅन्सरचा धोका 50% कमी! डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' फॉर्म्युला नक्की काय आहे?

Advertisement

या सर्व उपचारांचा एकत्रित परिणाम म्हणून पेशींचे आरोग्य सुधारते, पुनर्प्राप्तीचा वेग वाढतो आणि जीवनमान अधिक चांगले होण्यास मदत मिळते.डॉ. प्रदीप महाजन सांगतात, खरी पुनर्प्राप्ती तेव्हाच सुरू होते, जेव्हा आपण केवळ लक्षणांवर उपचार न करता शरीरातील पेशींना बळकट करण्यावर भर देतो. कारण ऊर्जा, दुरुस्ती आणि एकूण आरोग्याचा पाया हा पेशींमध्येच असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात सततचा थकवा सामान्य समजला जातो. मात्र, तो शरीराच्या ऊर्जानिर्मिती यंत्रणेत काहीतरी बिघाड होत असल्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे थकव्याच्या मूळ कारणांचा शोध घेऊन मायटोकॉन्ड्रियाचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. योग्य उपचार आणि जीवनशैलीतील सुधारणा यांच्या मदतीने ऊर्जा, सहनशक्ती आणि एकूण आरोग्य पुन्हा प्राप्त करणे शक्य होऊ शकते

Topics mentioned in this article