Vitamin B12 Deficiency Cause: शरीरामध्ये Vitamin B12ची कमतरता होण्यामागील गंभीर कारण, या 4 लोकांना मोठा धोका

Vitamin B12 Deficiency Cause: तुम्ही देखील हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता का आणि तरीही शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण झालीय का? जाणून घेऊया यामागील खरं कारण....

जाहिरात
Read Time: 3 mins
Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमागील कारणे

Vitamin B12 Deficiency Cause: व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे कित्येक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन शरीरासाठी किती आवश्यक आहे आणि व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होण्यामागील कारणे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारणं समजल्यानंतरच योग्य उपाय करणे शक्य होईल. व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होण्यामागील चार कारणे अतिशय सामान्य आहेत, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती... 

कित्येकदा असे होते की पोषक आहाराचे सेवन करणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता निर्माण होते. योग्य डाएटच्या माध्यमातूनच आपल्या शरीराला व्हिटॅमिन B12चा पुरवठा होतो. डीएनएपासून ते नसांच्या कार्यप्रणालीपर्यंत अशा कित्येक गोष्टींसाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक आहे. शरीरामध्ये या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास नसांचे गंभीररित्या नुकसान होऊन यामुळे हातापायांना मुंग्या येणे किंवा हातपाय सून्न होण्याचा त्रास उद्भवू शकते. शाकाहार करणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमरता अधिक निर्माण होते. कारण व्हिटॅमिन B12 मांस-मासे यासारख्या पदार्थांद्वारे मिळते.  

शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होण्यामागील कारणे | Vitamin B12 Deficiency Cause

पहिले कारण : पोटातील आम्लाचे प्रमाण कमी होणे

व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमागील सर्वात मोठे कारण म्हणजे पोटामध्ये आम्ल तयार न होणे. गॅस्ट्रिक आम्ल आणि व्हिटॅमिन बी12चा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यामध्ये खूप मोठा संबंध आहे. कारण अन्नाद्वारे व्हिटॅमिन B12 शोषले जाते. अन्नाद्वारे व्हिटॅमिन B12 शोषले जाण्यासाठी पोटामध्ये आम्ल तयार होणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाढत्या वयोमानानुसार पोटातील पीएचची पातळी वाढते यामुळे आम्लचे प्रमाण कमी होऊ लागते. तसेच वाढत्या वयानुसार व्हिटॅमिन बी12 शोषून घेण्याची शरीराची शक्तीही कमकुवत होऊ लागते. परिणामी वाढत्या वयामुळे शरीरामध्ये या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होऊ लागते. तसेच वेगवेगळ्या औषधांचाही पोटातील आम्लावर दुष्परिणाम होतो. 

(नक्की वाचा: शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, शाकाहाऱ्यांसाठी ठरेल रामबाण)

दुसरे कारण : ऑटोइम्युन आजार

दुर्लक्षित केले जाणारे दुसरे कारण म्हणजे ऑटोइम्युन आजार. या स्थितीमध्ये तुमच्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती शरीरातील निरोगी पेशींना नुकसान पोहोचवते. आपल्या पोटात दोन प्रकारच्या पेशी असतात, एक म्हणजे आम्ल तयार करणाऱ्या पेशी आणि दुसरी म्हणजे इंट्रिसिक फॅक्टर नावाचे कम्पाउंडचा स्त्राव करणाऱ्या पेशी. व्हिटॅमिन B12 शोषण्यासाठी या दोन्ही पेशी आवश्यक आहेत. ऑटोइम्युन आजारामध्ये आपले शरीर या दोन्ही पेशींना नुकसान पोहोचवू लागते, ज्यामुळे या पेशींची कमतरता निर्माण होते आणि शरीराद्वारे व्हिटॅमिन बी12 पूर्णपणे शोषले जात नाही, परिणामी व्हिटॅमिनची कमतरता भासते. 

Advertisement

(नक्की वाचा: Vitamin B12चा खजिना आहेत ही छोटीशी पाने, अंडी-चिकनपेक्षाही पावरफुल)

तिसरे कारण : बॅक्टेरियांची अतिप्रमाणात होणारी वाढ

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सीबो याचा अर्थ लहान आतड्यामधील बॅक्टेरियाची अतिप्रमाणात होणारी वाढ. या आजारामध्ये मोठ्या आतड्यातील शरीरासाठी पोषक मानल्या जाणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि हळूहळू मोठ्या आतड्यातून ते लहान आतड्यामध्ये प्रवेश करतात. यामुळे लहान आतड्यामध्ये बॅक्टेरियांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे अ‍ॅसिडिटी, मळमळणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अतिसार यासारख्या तक्रारी निर्माण होतात. वाढलेले बॅक्टेरिया शरीरातील व्हिटॅमिन B12 देखील खातात.   

(नक्की वाचा: Vitamin B12चा खजिना आहे ही डाळ, शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता कधीच होणार नाही; वाचा उपाय)

चौथे कारण 

शाकाहार करणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. कारण मांसाहार पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी12 प्रमाण अधिक असते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )