
Anger Issues Causes: राग येणे ही सामान्य बाब आहे. पण वारंवार राग येणे, कोणत्याही ठोस कारणाशिवाय राग येणे किंवा त्याचे स्वरुप अतिशय तीव्र असेल तर हे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण ही समस्या नेमके कोणत्या कारणामुळे होते? असा प्रश्न उद्भवतो. आजचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होणे सामान्य बाब आहे. पण याचा थेट तुमच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. परिणामी चिडचिड होणे, ताणतणाव येणे आणि वारंवार राग येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वारंवार राग येतो आणि ही समस्या कशी टाळावी, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
शरीरातील कोणत्या गोष्टीच्या कमतरतेमुळे राग येतो? | How To Control Anger Issues?
व्हिटॅमिन B6
व्हिटॅमिन B6मुळे मेंदूच्या भागात सेरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे न्युरोट्रान्समीटर तयार करण्यास होण्यास मदत मिळते. यामुळे मूड चांगला राहतो. व्हिटॅमिन बी6च्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा, अस्वस्थता, निद्रानाश यासारख्या समस्यांसह रागही येऊ शकतो.
व्हिटॅमिन B12
व्हिटॅमिन बी 12 हे एक असे तत्त्व आहे, जे डीएनए निर्मिती आणि पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन B12मुळे मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थकवा, नैराश्य आणि एकाग्रतेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
व्हिटॅमिन D
व्हिटॅमिन डीमुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. पण तुम्हाला माहितीये का व्हिटॅमिन डीमुळे आपल्या मूडवरही परिणाम होतात. शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यास नैराश्य आणि चिडचिडेपणाची समस्या निर्माण होऊ शकतो.
कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
संतुलित आहार : हिरव्या भाज्या, अख्खे धान्य, अंडे, मासे, दूध आणि सुकामेवा यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. याद्वारे व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन निघण्यास मदत मिळेल.
सूर्यप्रकाश : शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता झाली असल्यास नियमित सकाळी कमीत कमी 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे.
(नक्की वाचा: Vitamin B12 Deficiency Cause: शरीरामध्ये Vitamin B12ची कमतरता होण्यामागील खरं कारण काय? या 4 लोकांना सर्वाधिक धोका)
व्यायाम : मानसिक आरोग्यासाठी नियमित ध्यानधारणा आणि योगासनांचा सराव करणे आवश्यक आहे. यामुळे आजारांपासून शरीर निरोगी राहते आणि मेंदू देखील शांत होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Vitamin B12चा खजिना आहेत ही छोटीशी पाने, अंडी-चिकनपेक्षाही पावरफुल)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world