होळी हा रंगांचा सण आहे. त्याचबरोबर त्या दिवशी स्वादिष्ट पक्वानांची घरांमध्ये रेलचेल असते. यावर्षी 14 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. होळी हा रंगांचा आणि मस्तीचा उत्सव आहे. त्या दिवशी अनेक जण ठंडाईचे सेवन करतात. या ठंडाईमध्ये भांग मिसळून पितात. भांगेची नशा अनेक काळ टिकते. तुम्ही भांगेचं सेवन सुरु केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लक्षात येत नाही. पण, हळू-हळू त्याची नशा वाढू लागते. त्यानंतर ती व्यक्ती एका वेगळ्याच जगात पोहोचते, असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही.
भांग घेतल्यानंतर अनेकांना हँगओव्हर होतो. तो अनेक काळ टिकतो. ही नशा उतरण्यासाठी मोठा वेळ लागतो. या हँगओव्हरमध्ये लोकांना उल्टी, डोकेदुखी, अशक्तपणा यासारखा त्रास होतो. तुम्ही भांग घेतली असेल आणि तुम्हाला नशेचा हँगओव्हर कमी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. त्याच्या मदतीनं तुम्ही नशा लवकर कमी करु शकता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लिंबू आणि आंबट फळ
लिंबू हे आंबट असते. नशा कमी करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या घरगुती उपायांमध्ये याचा समावेश आहे. त्याचबरोबर तुम्ही संत्री, मोसंबीसारख्या आंबट फळांची देखील मदत घेऊ शकतात. त्यामधील एंटीऑक्सीडेंट नशा कमी करण्यास मदत करतात. नशा उतरवण्याठी अर्ध्या लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याचं सेवन करा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
नारळ पाणी
आपण एखाद्या मादक पदार्थाचे सेवन करतो त्यावेळी शरीर डिहायड्रेट होते. त्यावेळी स्वत:ला हायड्रेट ठेवा त्यामुळे नशा कमी होण्यास मदत होते. नारळ पाणी घेतल्यानं त्यामधील मिनिरल्स आणि इलेक्ट्रोलाईट्स शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
( नक्की वाचा : होळीची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि होलिका दहनाची पौराणिक कथा जाणून घ्या )
आले
आल्याचं सेवन देखील नशा कमी करण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यासाठी आल्याचा एक तुकडा तोंडात टाका आणि चघळा. तुम्ही थेट आलं खाऊ शकत नसाल तर मध, लिंबू किंवा कोमट पाण्यात आल्याचा रस मिसळून त्याचं सेवन करु शकता.
(स्पष्टीकरण : ही संपूर्ण माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क यामधील कोणत्याही माहितीला जबाबदार असल्याचा दावा करत नाही.)