उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्ह सर्वात आधी शरीरातील पाणी शोषून घेते. शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) झाल्यास चक्कर येऊ लागते, अशक्तपणा जाणवतो आणि उन्हात माणूस कोसळूही शकतो. त्यात या काळात बाहेर उष्णतेची लाट (Heatwave) देखील असते. म्हणूनच स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी पिणे तर आवश्यक आहेच, पण त्यासोबत असे पेय पिणे देखील महत्त्वाचे आहे, जे शरीराला हायड्रेट ठेवतील आणि थंड ठेवतील. डाएटिशियन लवलीन कौर देखील अशाच काही थंडगार पेयांची रेसिपी शेअर केली आहे. ही पेये फक्त 2 मिनिटांत तयार होतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उन्हाळ्यासाठी थंडगार पेय
कलिंगड ज्यूस
कलिंगड हे पाण्याने परिपूर्ण फळ आहे. उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्याने किंवा त्याचे पेय बनवून प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. पाण्याची कमतरता ही पूर्ण होते. ते बनवण्यासाठी कलिंगडाच्या बिया काढून घ्या. पुदिन्याच्या पानांसोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात लिंबू, काळे मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून मिक्स करा आणि चव घेऊन प्या. हे ज्यूस तुम्हाला उन्हाळ्यात कमलीचं समाधान देईल.
लस्सी
भारतीय घरांमध्ये लस्सी (Lassi) बनत नाही असे होणे शक्यच नाही. लस्सी चविष्ट आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर पेय आहे. लस्सी बनवण्यासाठी दही आणि पाणी चांगले मिक्स करून घ्या. त्यात पुदिन्याची पाने, काळे मीठ आणि भाजलेले जिरे पावडर टाकून मिक्स करा. लस्सी उन्हात तुमच्या शरिराचे तापमान योग्य ठेवण्यास मदत करते.
लिंबू आणि चिया सीड्स वॉटर
साधे लिंबू पाणी पिण्याऐवजी चिया सीड्स टाकून कूलिंग डिटॉक्स वॉटर (Cooling Water) तयार करता येते. यासाठी एक चमचा चिया सीड्स एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार थोडे सेंधे मीठ घाला. हे पेय चव घेऊन पिता येते.
नारळ पाणी
डाएटिशियनने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की बाटलीतील लिंबू पाणी पिण्याऐवजी ताजे नारळ पाणी (Coconut Water) पिऊ शकता. प्लास्टिकच्या स्ट्रॉने पिण्याऐवजी नारळ पाणी ग्लासमध्ये काढून प्यावे. नारळ पाणी हे आरोग्यास खूप चांगले समजले जाते. आजारी असतानाही अनेक वेळा डॉक्टरही नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. उन्हाळ्यातही नारळ पाणी पिणे कधीही चांगले समजले जाते.
गुलकंदचे पाणी
आजकाल गोंद कतीराचे ड्रिंक्स खूप लोकप्रिय आहेत. याचे कारण म्हणजे गोंद कतीरामध्ये (Gond Katira) असलेले अनेक फायदे. गोंद कतीरा शरीराला थंडावा देतो. हे पेय बनवण्यासाठी एक चमचा गोंद कतीरा अर्धा ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. त्यात एक चमचा चिया सीड्स देखील टाकू शकता. दुसऱ्या दिवशी एका ग्लास पाण्यात एक चमचा गुलकंद घाला आणि मग हे पाणी गोंद कतीराच्या पाण्यासोबत मिक्स करून प्या. हे चविष्ट पेय तुमच्यासाठी आरोग्याचा खजिना ठरेल.
सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी 1 तज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एनडीटीव्ही या माहितीची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे या गोष्टी ट्राय करण्या आधी संबंधीत तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.