- उन्हाळ्यात मुलांचे शरीर जलद डिहायड्रेट होते आणि त्यांची पचनसंस्था संवेदनशील होते
- आईस्क्रीम आणि अतिथंड पदार्थांमुळे मुलांना घशाचे संक्रमण तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते
- कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो
Avoid giving these foods to kids in summers: सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात मुलांचे शरीर लवकर डिहायड्रेट होते. त्यांची पचनसंस्थाही संवेदनशील बनते. अशा वेळी पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनवधानाने दिलेल्या काही पदार्थांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. उन्हामुळे लहान मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. उन्हाळ्यात मुलांची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा आहार योग्य असणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा आपण थंड वाटणारे पदार्थ मुलांना देतो, जे प्रत्यक्षात त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
हे पदार्थ टाळणे हिताचे
- आईस्क्रीम आणि अतिथंड पदार्थ- उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी मुले वारंवार आईस्क्रीम मागतात. मात्र, अतिथंड पदार्थांमुळे घशाचे संक्रमण आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
- कोल्ड ड्रिंक्स- यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो.
- तळलेले पदार्थ- समोसे, भजी यांसारखे तेलकट पदार्थ पचायला जड असतात, ज्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात.
- मसालेदार अन्न- जास्त तिखट अन्नामुळे शरीरातील उष्णता वाढते.
- शिळे अन्न- उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, त्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका असतो.
- पॅकेज्ड ज्यूस- यात प्रिझर्व्हेटिव्हज आणि साखर जास्त असते.
- फास्ट फूड- पिझ्झा, बर्गरमुळे शरीराला पोषण मिळत नाही.
- गोड पदार्थ- अति गोडव्यामुळे मुलांना सुस्ती येते.
आरोग्यदायी पर्याय
मुलांना उन्हाळ्यात टरबूज, काकडी, दही, ताक आणि शहाळ्याचे पाणी द्यावे. ताज्या आणि हलक्या आहारामुळे मुलांचे शरीर थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात मुलांना खूप जास्त आईस्क्रीम देणे टाळावे, कारण यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. तसेच, बाजारातील कोल्ड ड्रिंक्स आणि सोडा मुलांच्या शरीरातील ओलावा शोषून घेतात. उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे वडापाव, चिप्स किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने मुलांना अस्वस्थ वाटू शकते.