Home Remedies: भूक लागत नाहीये? मग 'हे' 5 घरगुती उपाय करून नक्की पाहा, झटपट वाढेल भूक

जर तुम्हाला कर्करोग, लिव्हरचे गंभीर आजार किंवा आतड्यांच्या समस्या असतील, तर घरगुती उपायांसोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

कमी भूक लागणे किंवा अन्न खाण्याची इच्छा न होणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेकदा आजारपणानंतर येणारा अशक्तपणा, मानसिक ताण किंवा पचनसंस्थेतील बिघाड यामुळे ही समस्या उद्भवते. अशा वेळी केवळ औषधांवर अवलंबून न राहता योग्य आहार आणि घरगुती उपचारांची जोड देणे आवश्यक असते. आजारपणातून बरे होताना शरीराला पोषक तत्त्वांची गरज असते. पण अनेकदा अशा वेळी भूक लागत नाही. अशा परिस्थितीत पचनसंस्था पुन्हा पूर्ववत करण्यासाठी निसर्गातील काही घटक अत्यंत प्रभावी ठरतात. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून आपण ही समस्या सोडवू शकतो.

दिवसभरात 2-3 वेळा कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते. शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. याउलट, थंड पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे भूक मंदावू शकते. आजारपणात जड अन्नाऐवजी मुगाची खिचडी, दलिया किंवा भाज्यांचे सूप यांसारखा हलका आणि गरम आहार घ्यावा. चव आणि भूक वाढवण्यासाठी काही उपाय आहेत. अनेकदा आजारपणामुळे तोंडाची चव जाते. अशा वेळी लिंबाचे दोन भाग करून त्यावर काळी मिरी पूड आणि मीठ टाकून त्याचे सेवन करावे. यामुळे जिभेची चव परत येते आणि भूक वाढण्यास मदत होते.

Advertisement

नक्की वाचा - Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

आहारात ओवा आणि सैंधव मिठाचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते. जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ एकत्र करून घेतल्यास पाचक रसांची निर्मिती वाढते. तसेच, आवळा पावडर किंवा लिंबावर मिरी पूड टाकून त्याचे सेवन केल्याने तोंडाला चव येते. जर लिव्हर किंवा पोटाचे गंभीर आजार असतील, तर घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात. एकाच वेळी खूप जास्त खाण्याऐवजी थोड्या थोड्या प्रमाणात पौष्टिक आहार घ्यावा. हे सर्व उपाय सामान्य कारणांसाठी प्रभावी आहेत. मात्र, जर तुम्हाला कर्करोग, लिव्हरचे गंभीर आजार किंवा आतड्यांच्या समस्या असतील, तर घरगुती उपायांसोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हे उपाय करून पाहा:

  • 1. आलं आणि लिंबू: जेवणाआधी आल्याच्या तुकड्यावर लिंबू आणि मीठ लावून खा. हा सर्वात जुना आणि गुणकारी उपाय आहे. 
  • 2. ओव्याचा वापर: अर्धा चमचा ओवा (सुमारे 2-3 ग्रॅम), सैंधव मीठ आणि लिंबाचा रस एकत्र घेतल्यास पोटाचे विकार दूर होतात. 
  • 3. पुदिना सरबत: पुदिना, लिंबू आणि काळे मीठ यांचे मिश्रण प्यायल्याने पोटातील गॅस कमी होतो. 
  • 4. आवळा: पचन सुधारण्यासाठी आवळा पावडर अत्यंत फायदेशीर ठरते.