What Happens After Drinking Beer : तरुणांमध्ये बिअर पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. पार्ट्यांमध्ये, विकेंडला फिरायला गेल्यावर अनेक जण बिअरचे सेवन करतात.बिअरला (आरोग्यावर परिणाम) हार्ड ड्रिंकच्या तुलनेत कमी असतो, असं म्हटलं जातं. पण बिअर प्यायल्याने आरोग्यावर अजिबात परिणाम होत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही.कोणत्याही अल्कोहोलिक ड्रिंकप्रमाणेच बिअरचा परिणामही शरीर आणि मेंदूवर होतो. त्यामुळे बिअर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळीच पिणे गरजेचे आहे.बिअर प्यावी की नाही आणि जर प्यायची असेल तर किती प्रमाणात? असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. जर तुम्ही निरोगी असाल आणि कोणतीही वैद्यकीय समस्या नसेल, तर महिन्यात 2-4 वेळा मर्यादित प्रमाणात बिअर पिणे योग्य मानले जाते.
आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार:
पुरुष: एका दिवशी जास्तीत जास्त 650 मिली (2 ग्लास) पेक्षा अधिक पिऊ नका.
महिला: एका दिवशी जास्तीत जास्त 330 मिली (1 ग्लास)
दररोज बिअरचं सेवन केल्यास वजन वाढवू शकते,यकृत खराब होऊ शकतं आणि झोपेची गुणवत्ताही चांगली राहत नाही.
आरोग्यासाठी कोणती बिअर चांगली असते?
जर तुम्ही कधी कधी बिअरचं सेवन करत असाल,तर लाइट आणि लो-कॅलरी बिअर अधिक चांगली मानली जाते.यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते,ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत नाहीत.
- लाइट बिअर
- गव्हापासून बनवलेली बिअर
- लो-कार्ब बिअर
नक्की वाचा >>
साधारणपणे बिअरची नशा 2 ते 4 तास टिकतो. मात्र, हे खालील गोष्टींवर अवलंबून असते
- किती प्रमाणात प्यायली आहे
- शरीराचे वजन आणि मेटाबॉलिझम
- रिकाम्या पोटी की जेवणासोबत प्यायली आहे
- अल्कोहोल सहन करण्याची क्षमता किती आहे
बिअरचा नशा काही तास टिकतो, जे व्यक्तीच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण आणि यकृताच्या मेटाबॉलिझमवर अवलंबून असतो. साधारणपणे एक बिअर प्यायल्यानंतर व्यक्तीला नशेतून पूर्णपणे सावरायला जवळपास 2 ते 5 तास लागू शकतात.
काही परिस्थितींमध्ये बिअर पिणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे
- गर्भावस्था किंवा स्तनपानाच्या काळात
- जर यकृत, मूत्रपिंड किंवा हृदयाचे आजार असतील
- रिकाम्या पोटी
- औषधे घेत असाल तर
- ड्रायव्हिंग किंवा मशीन ऑपरेट करण्यापूर्वी
- अत्यंत ताण किंवा भावनिक कमजोरीच्या वेळी
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.