Scholarship 2026: आता एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाचं नो टेन्शन! या पालकांना मिळणार दरमहा 1000 रुपये

जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असाल आणि शिक्षणाची तुम्हाला खूप आवड असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
CBSE Scholarship 2026

CBSE Scholarship 2026 : जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असाल आणि शिक्षणाची तुम्हाला खूप आवड असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रिय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSC) अशा मुलींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे, ज्यांना त्यांचं शिक्षण सुरु ठेवायचं आहे. सीबीएससी सिंगल गर्ल चाईल्ड स्कॉलरशिप (SGC) योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता देत आहेत. 

अनेकदा आर्थिक संकट किंवा अन्य कारणांमुळे मुलीचं शिक्षण मध्येच थांबलं जातं. हेच लक्षात घेता सीबीएसई ने या खास स्कॉलरशिपची सुरुवात केली आहे.जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. या स्कॉलरशिपसाठी काय पात्रता असणे आवश्यक आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

Advertisement

CBSE Scholarship 2026 : कोणाला मिळणार ही स्कॉलरशिप?

एकुलती एक मुलगी 

ही योजना फक्त त्या मुलींसाठी आहे,ज्या त्यांच्या आई-वडिलांची एकुलते एक आपत्य आहेत. म्हणजेच त्यांना कोणी भाऊ-बहीण नाही. (जर जुळ्या बहिणी असतील,तर त्या दोघीही यासाठी पात्र ठरतील.)

शिक्षण आणि शाळा

विद्यार्थ्या 2025 मध्ये सीबीएसईमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत आणि ते सीबीएसई मान्यता प्राप्त शाळेतच अकरावीत शिक्षण घेणारे पाहिजेत. 

मार्क्सच्या अटी

विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत कमीत कमी 70 टक्के गुण असले पाहिजेत.

ट्यूशन फी 

शाळेची ट्यूशन फी दहावीत 2500 रुपये प्रति महिना आणि 11 वी-12 वी मध्ये 3000 रुपये प्रति महिन्यापेक्षा जास्त नसावी. एनआरआय विद्यार्थ्यांसाठी ही अट 6000 रपयांपर्यंत आहे.

फॅमिली इन्कम

कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे.

CBSE Scholarship 2026 : किती मिळणार मदत? 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये प्रति महिना स्कॉलरशिप देण्यात येईल. हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (ECS/NEFT) च्या माध्यमातून पाठवण्यात येतील. ही मदत 11 वी आणि 12 वी म्हणजेच पूर्ण दोन वर्षांपर्यंत मिळते. 

CBSE Scholarship 2026 : जुनी स्कॉलरशिप रिन्यू होऊ शकते का?

ज्या विद्यार्थ्यांनी गतवर्षी ही स्कॉलरशिप घेतली होती, ते विद्यार्थी 12 वी इयत्तेसाठी रिन्यू करू शकतात. विद्यार्थ्यींनी 11 वी इयत्तेत कमीत कमी 70 टक्के गुण मिळवले पाहिजेत. 

Advertisement

CBSE Scholarship 2026 : अर्ज कसा कराल?

सर्वात आधी सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईट (cbse.gov.in) ला भेट द्या. त्यानंतर 'Scholarship'सेक्शनमध्ये जाऊन 'Single Girl Child Scholarship 2026' च्या लिंकवर क्लिक करा. महत्त्वाचे कागदपत्र जसं की, फी रिसिप्ट, इन्कम सर्टिफिकेट आणि मार्कशिट अपलोड करा. अर्ज भरल्यानंतर शाळेतून ते व्हेरिफाय करणं आवश्यक आहे.