घर बसल्या PF बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या 3 सोप्या आणि प्रभावी पद्धती, 1 मिनिटात सर्व माहिती

उमंग ॲपचा वर तुम्हाला सविस्तर पासबुक पाहायचे असेल, तर 'उमंग' (UMANG) ॲप डाउनलोड करा.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • भविष्य निर्वाह निधीच्या (PF) खात्यातील रक्कम ऑनलाइन तपासण्यासाठी काय करावे
  • EPFO च्या उमंग ॲपद्वारे कर्मचाऱ्यांना संपूर्ण PF पासबुक पाहण्याची आणि सर्व योगदानाची माहिती मिळते
  • बॅलन्स तपासण्यासाठी SMS, मिस्ड कॉल आणि उमंग ॲप या तीन प्रमुख मार्गांचा वापर करता येतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

How to Check EPF Balance Online: प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा बचतीचा एक महत्त्वाचा आधार असतो. आपल्या पगारातील ठराविक हिस्सा आणि कंपनीचे योगदान मिळून ही रक्कम जमा होते. मात्र, आपल्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी आता कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. ईपीएफओने (EPFO) उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल सुविधांमुळे काही मिनिटांत मोबाईलवर बॅलन्स तपासणे शक्य झाले आहे.

बॅलन्स तपासण्यासाठी एसएमएस (SMS), उमंग ॲप आणि मिस्ड कॉल असे तीन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. उमंग ॲपच्या माध्यमातून केवळ शिल्लकच नाही, तर संपूर्ण पासबुक पाहण्याची सुविधा मिळते. यामध्ये कर्मचाऱ्याचा हिस्सा, कंपनीचा हिस्सा आणि पेन्शनमधील योगदान याची सविस्तर माहिती उपलब्ध होते. त्यातून तुम्हाला पीएफची सर्व माहिती मिळते. या सेवांचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचा मोबाईल नंबर 'UAN' पोर्टलवर नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. 

नक्की वाचा - Trending News: ऑस्ट्रेलियात भारतीय टॅक्सी ड्रायव्हरची 10 तासात किती कमाई? भारतात तेवढ्या कमाईसाठी लागतात...

तांत्रिक सुलभतेमुळे आता सर्वसामान्य कामगारांनाही आपल्या हक्काच्या पैशांचा हिशोब ठेवणे सोपे झाले आहे. बॅलन्स तपासण्याचे तीन मार्ग आहेत. त्यात एसएमएस (SMS): 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवा. (उदा. EPFOHO 123456789000 MAR - मराठी भाषेसाठी). त्यानंतर मिस्ड कॉल (Missed Call): 9966044425 या क्रमांकावर कॉल केल्यास काही वेळात एसएमएसद्वारे माहिती मिळेल. शिवाय उमंग ॲप (UMANG App): ॲपमध्ये ईपीएफओ (EPFO) सेवा निवडून व्ह्यू पासबुकवर क्लिक करा. त्यात सर्व माहिती मिळते. 

नक्की वाचा - Success Story: 20 रूपयांची मॅगी विकून महिन्याला कामावतो लाखो, समोर आले कमाईचे थक्क करणारे गणित

उमंग ॲपचा वर तुम्हाला सविस्तर पासबुक पाहायचे असेल, तर 'उमंग' (UMANG) ॲप डाउनलोड करा. तिथे 'View Passbook' पर्यायावर जाऊन तुमचा UAN नंबर टाका आणि संपूर्ण खात्याचा तपशील एका क्लिकवर मिळवा. नोकरदारांसाठी ही खरंच मोठी आनंदाची बातमी आहे. तुमचा यूएएन (UAN) नंबर सक्रिय असणे आणि तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे या कामासाठी आवश्यक आहे. या सुविधेमुळे पारदर्शकता वाढली असून कर्मचाऱ्यांना स्वतःच्या बचतीवर लक्ष ठेवता येत आहे.

Advertisement