LPG Gas Cylinder Video : सिलिंडर रिकामा आहे की भरलेला? 2 कोटी लोकांनी पाहिली गॅस तपासण्याची 'ही' अनोखी पद्धत

तुम्ही घरबसल्या एलपीजी गॅस सिलिंडर (LPG gas level check) चेक करू शकता. ते सुद्धा कोणत्या मशिनच्या वापराशिवाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर गॅस सिलिंडर तपासण्याबाबतचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
How To Check LPG Gas In Cylinder

How to know in Cylinder LPG Level: देशभरात एलपीजी (LPG) सिलिंडरबाबत अनेक लोक समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. अशातच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 20 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओत दावा केला आहे की,तुम्ही घरबसल्या एलपीजी गॅस सिलिंडर (LPG gas level check) चेक करू शकता. ते सुद्धा कोणत्या मशिनच्या वापराशिवाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर गॅस सिलिंडर तपासण्याबाबतचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे.

ओल्या कपड्यांचा सोपा उपाय (Simple Wet Cloth Method)

व्हिडीओत पाहू शकता की, सर्वात आधी सिलिंडरला एका ओल्या कपड्यात चांगल्या प्रकारे पुसा. त्यानंतर 2 मिनिट वाट पाहा. त्यानंतर खरा खेळ सुरु होतो. जिथपर्यंत सिलिंडरमध्ये गॅस भरलेली असते, तो भाग खूप वेळ ओलाच राहतो. रिकामा भाग लवकर सुकतो. म्हणजे ओल्या आणि सुक्या भागाला पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे..

Advertisement

एलपीजीची ही व्हायरल ट्रीक सोपी आणि इंटरेस्टिंग आहे. पण या ट्रीकबाबत कोणत्याही प्रकारची खात्री देण्यात आली नाही.एक्स्पर्टच्या माहितीनुसार, या ट्रीकच्या माध्यमातून फक्त अंदाज लावू शकता. हा पूर्णपणे योग्य उपाय नाही. सोशल मीडियावर लोक याबाबत मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, गॅसचं तर माहित नाही,सिलिंडर साफ नक्की होईल.तर काही यूजर्सचं म्हणणं आहे की, त्यांची आई तर कोणत्याही ट्रीकशिवायच सांगते की, सिडिंलर किती दिवस पुरेल.