बालकनीतील कबुतरांच्या त्रासाने हैराण आहात? या 'स्मार्ट' ट्रिक्स वापरून त्यांना लावा कायमचे पळवून

कबुतरांच्या विष्ठेतून निघणारे बॅक्टेरिया फुफ्फुसांच्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. हा धोका ओळखून वेळीच प्रतिबंधात्मक पाऊले उचलणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बालकनीत कबुतरांनी मुक्काम केल्यामुळे घाण, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात
  • बालकनीत बर्ड नेट किंवा पारदर्शक नायलॉन जाळी लावल्यास कबुतर येण्यापासून प्रभावी प्रतिबंध होतो
  • चमकदार आणि हलणाऱ्या वस्तू जसे जुने सीडी किंवा रिफ्लेक्टिव्ह टेप कबुतरांना बालकनीत येण्यापासून रोखतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Balcony Pigeon Control Tips: घराची बालकनी म्हणजे ताजी हवा आणि निवांतपणाची जागा. मात्र, अनेकदा याच बालकनीत कबुतरांनी आपला मुक्काम ठोकलेला असतो. कबुतरांची घाण आणि त्यांच्यामुळे पसरणारी दुर्गंधी केवळ अस्वच्छता निर्माण करत नाही, तर आरोग्यासाठीही ती घातक ठरू शकते. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार आणि विविध प्रकारच्या ॲलर्जीचा धोका असतो. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही कबुतरांना कायमचे पळवून लावू शकता.

बालकनीत कबुतरांना येण्यापासून रोखण्यासाठी 'बर्ड नेट' किंवा नायलॉनची जाळी लावणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. बाजारात पारदर्शक जाळ्या उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुमच्या बालकनीचे सौंदर्य खराब होत नाही आणि हवा-प्रकाशही रोखला जात नाही. एकदा जाळी लावली की कबुतरांना आत येण्यासाठी जागाच राहत नाही. त्यामुळे कबुतरांना प्रतिबंध करायचा असेल तर अशा जाळ्या लावणे फायद्याचे ठरू शकतात. त्यामुळे कबुतर तुमच्या बालकनीत प्रवेश करु शकणार नाहीत. 

Advertisement

नक्की वाचा - When To Replace Matka: मडके कधी बदलावे, मडक्याची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? जुन्या मडक्यामुळे काय परिणाम होतील?

कबुतरांना चमकदार आणि हलणाऱ्या वस्तूंपासून भीती वाटते. तुम्ही तुमच्या बालकनीत जुन्या सीडी (CDs), ॲल्युमिनियम फॉइलचे तुकडे किंवा रिफ्लेक्टिव्ह टेप लावू शकता. वाऱ्यामुळे या वस्तू जेव्हा हालतात आणि त्यांच्यावर प्रकाश पडतो, तेव्हा त्याच्या चमकामुळे कबुतरं तिथे येण्याचे टाळतात. त्यामुळे यावस्तू तुम्ही तुमच्या बालकनी मध्ये लावा. त्याच रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे तुम्हा आजच ही स्मार्ट ट्रिक्स येथे वापरून पाहा. 

काही विशिष्ट पदार्थांचा उग्र वास कबुतरांना सहन होत नाही. यामध्ये कापूर, लसूण किंवा व्हिनेगरचा समावेश होतो. कापूरच्या गोळ्या बालकनीच्या कोपऱ्यात ठेवा किंवा व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण करून तिथे फवारा. या वासामुळे कबुतरं त्या जागेपासून लांब राहतात. हा एक अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो. अनेक जण या गोष्टीचा वापर करत असतात. या मुळे कबुतर तुमच्या बालकनी पासून लांब राहाणे पसंत करतात. तुम्ही ही याचा वापर निश्चित करू शकता.  

नक्की वाचा - Health News: 15 दिवस रोज 'जीरा पाणी' प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या त्याचे फायदे अन् तोटे

कबुतरं अशाच ठिकाणी येतात जिथे त्यांना खायला दाणे किंवा पाणी मिळते. जर तुमच्या बालकनीत कचरा किंवा अन्नाचे कण पडलेले असतील, तर ते स्वच्छ ठेवा. नियमित साफसफाई केल्यास कबुतरांचा वावर आपोआप कमी होतो. शहरी भागातील सोसायट्यांमध्ये सध्या कबुतरांची समस्या गंभीर बनली आहे. कबुतरांच्या विष्ठेतून निघणारे बॅक्टेरिया फुफ्फुसांच्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. हा धोका ओळखून वेळीच प्रतिबंधात्मक पाऊले उचलणे आवश्यक आहे. 

Advertisement