Health Tips In Marathi : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या येतात,ज्या चविष्ट तर असतातच,पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात.त्यापैकीच एक म्हणजे फुलकोबी.हिवाळा सुरू होताच बाजारात सर्वत्र फुलकोबी दिसू लागते. अनेक लोकांना फुलकोबीची भाजीही आवडते.तर काही कोबीचे पकोडे आणि पराठेही खाणं पसंत करतात. कोबीमध्ये किड असणे, ही एक मोठी समस्या असते. अनेकदा कोबी बाहेरून स्वच्छ दिसते,पण कापल्यावर त्या कोबीतून किडे बाहेर निघतात.'किडे असलेली फुलकोबी कशी ओळखायची', असा प्रश्न अनेकांना पडतो. कोबीमध्ये किडे आहेत का नाही? हे तुम्हाला कोबी खरेदी करण्यापूर्वीच माहित होईल. जाणून घ्या याबाबतच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स..
फुलांवरून ओळखा
नेहमी बाजारातून किंवा गाड्यांवरून अशी फुलकोबी घ्या ज्याची फुले घट्टपणे एकमेकांना जोडलेली असतील.अशा फुलकोबीमध्ये किडे असण्याची शक्यता खूपच कमी असते.तसेच ज्या फुलकोबीच्या फुलांमध्ये खूप मोकळी जागा दिसते किंवा फुले विखुरलेली दिसतात,त्यात किडे असू शकतात.अशी फुलकोबी घेणे टाळा.
कोबीचा देठ तपासा
कोबी खरेदी करण्यापूर्वी ती उलटी करून देठ नक्की तपासा. जर देठ तुम्हाला पोकळ वाटत असेल किंवा त्यात छिद्रे दिसत असतील, तर त्यात किडे असू शकतात.अशाप्रकारची कोबी अजिबात खरेदी करू नका."
नक्की वाचा >> Health News: या एका चुकीमुळे तुमचं आरोग्य बिघडणार! 1 दिवसात किती मीठ खावं? मीठ खाण्याची योग्य पद्धत कोणती?
कोबीची पाने ताजी आहे की नाही, हे तपासा
जर कोबीची पाने खूपच कोमेजलेली किंवा पिवळी दिसत असतील,कोबीच्या आत किडा असण्याची शक्यता असते.ज्या कोबीची पाने अगदी ताजी आणि देठाला घट्ट जोडलेली असतात,त्यात किडे असण्याची शक्यता खूपच कमी असते.
रंगावर लक्ष देणे महत्त्वाचे
नेहमी दूधासारखा पांढरा रंग असलेली फुलकोबी घ्या.अशी फुलकोबी ताजी असते आणि त्यात किडे नसतात.जर तिच्यावर काळे डाग दिसत असतील,तर त्यात फंगस लागायला सुरुवात झालेली असते आणि किडेही असण्याचीही शक्यता असते.अशी फुलकोबी खरेदी करण्याचे टाळा.