Pan Card : हरवलंय की चोरी झालंय पॅनकार्ड? असं करा ऑनलाईन प्रिंटिंग, 'ही' आहे सर्वात सोपी प्रोसेस

पॅन कार्ड (PAN) हरवणे किंवा चोरी गेल्यास नाहक त्रास तर होतोच पण त्यामुळे तुमची आर्थिक सुरक्षितताही धोक्यात येऊ शकते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ओरिजिनल PAN कार्ड रीप्रिंटसाठी अर्ज करू शकता. वाचा सर्व प्रोसेस..

जाहिरात
Read Time: 2 mins
Pan Card Online Printing Process

Pan Card Reprinting Process : पॅन कार्ड (PAN) हरवणे किंवा चोरी गेल्यास नाहक त्रास तर होतोच पण त्यामुळे तुमची आर्थिक सुरक्षितताही धोक्यात येऊ शकते. PAN कार्ड हे फक्त ओळखपत्र नाही तर तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची ‘चावी'आहे. त्यामुळे पॅन कार्ड हरवणे, हा एक मोठा प्रश्न ठरू शकतो.  पण दिलासादायक बाब म्हणजे डुप्लिकेट PAN कार्ड बनवणे आता खूप सोपे झाले आहे. तुमचे PAN कार्ड चोरी झाले असेल किंवा कुठेतरी हरवले असेल, तर आता तुम्हाला सरकारी कार्यालयांत फेर्‍या मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ओरिजिनल PAN कार्ड रीप्रिंटसाठी अर्ज करू शकता.

सर्वप्रथम एफआयआर (FIR) दाखल करा

जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल किंवा चोरी झालं असेल, तर सर्वात आधी तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल केल्याने याबाबत अधिकृत नोंद होते. त्यामुळे पॅनकार्ड गैरवापर किंवा अवैध आर्थिक व्यवहारांमध्ये वापर होण्यापासून तुमचे संरक्षण होते.याशिवाय,डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करताना एफआयआरची प्रत उपयोगी पडते.यामुळे तुमची अर्ज प्रक्रिया सोपी होते आणि नवे पॅन कार्ड मिळण्यात कोणतीही अडचण किंवा विलंब होत नाही.

नक्की वाचा >> Ajit Pawar Death: ट्रॅफिकमुळे 'तो' निर्णय घ्यावा लागला अन् होत्याचं नव्हतं झालं, त्या दिवशी काय घडलं?

रीप्रिंटसाठी अर्ज कसा कराल?

अधिकृत वेबसाइट https://nsdl.co.in/ वर जा आणि “Reprint PAN Card” या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर PAN नंबर, आधार नंबर, जन्मतारीख अशा आवश्यक माहिती भरा आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP येईल. तो OTP भरून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
शेवटी फी भरताच प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमचे PAN कार्ड रीप्रिंटसाठी नोंदवले जाईल.

नक्की वाचा >> समृद्धी महामार्गावर काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, तोंडाला रुमाल बांधून टोळी आली अन्..पाहा video

किती असते अर्जाची फी?

डुप्लिकेट PAN कार्ड बनवण्यासाठी अर्जाची फी 50 रुपये असते,जी तुम्ही ऑनलाइन सहज भरू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळते,ज्यामध्ये ट्रॅकिंग नंबर दिलेला असतो.या ट्रॅकिंग नंबरच्या मदतीने तुम्ही तुमच्या पॅन कार्डच्या डिलिव्हरीचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता.अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काहीच दिवसांत तुमचे नवे पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते.

Advertisement