महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल; महाराष्ट्रात देशातील पहिले Menopause Clinic सुरू, वाचा सर्व वौशिष्ट्ये

India's First Menopause Clinic : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Menopause Clinic : हिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मेनोपॉज क्लिनिकची संकल्पना राबवण्यात आली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:


India's First Menopause Clinic Launched in Maharashtra: स्त्रीच्या आयुष्यात वयानुसार अनेक शारीरिक बदल घडत असतात. यामध्ये चाळीशीनंतर येणारा मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा मानला जातो.  एखाद्या महिलेचे मासिक चक्र नैसर्गिकरित्या थांबते, तेव्हा त्याला मेनोपॉज असे म्हणतात. या काळात शरीरातील हॉर्मोन्समध्ये मोठे बदल होतात, ज्याचा थेट परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. 

चिडचिड होणे, अचानक खूप उष्ण वाटणे, हाडे ठिसूळ होणे आणि नैराश्य येणे अशा समस्यांना अनेक स्त्रियांना सामोरे जावे लागते. आजवर या विषयावर फारसे उघडपणे बोलले जात नव्हते, मात्र हीच गरज ओळखून आता महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मेनोपॉज क्लिनिकची संकल्पना राबवण्यात आली आहे.

ऐतिहासिक पाऊल आणि क्लिनिकची गरज

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि शहरी भागांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. मेनोपॉजच्या काळात होणाऱ्या त्रासाकडे अनेकदा कौटुंबिक किंवा सामाजिक स्तरावर दुर्लक्ष केले जाते.

 हे क्लिनिक अशा महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहेत, ज्यांना या काळात योग्य वैद्यकीय सल्ल्याची आणि मानसिक आधाराची नितांत गरज असते. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

( नक्की वाचा : दक्षिणेकडचा मेगास्टार, राज घराण्यातली अभिनेत्री: रहमान यांचं संगीत असलेलं हे मराठी गाणं पाहिलं का? VIDEO )
 

मेनोपॉज क्लिनिकची प्रमुख वैशिष्ट्ये

या क्लिनिकची रचना महिलांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. येथे महिलांना एकाच छताखाली विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, आणि हॉर्मोनल बदलांमुळे होणाऱ्या त्रासावर उपचार यांचा समावेश आहे. 

Advertisement

त्याशिवाय महिलांच्या हाडांची मजबूती, हृदयाचे आरोग्य आणि आवश्यक हॉर्मोन तपासणीची सोय देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. योग्य औषधोपचार आणि भविष्यात घ्यावयाची काळजी याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन येथे दिले जाते, ज्यामुळे महिलांना रजोनिवृत्तीचा हा काळ सुसह्य होणार आहे.

( नक्की वाचा : WhatsApp आता फुकट वापरता येणार नाही? लवकरच येणार Subscription Plan! वाचा सर्व माहिती )
 

महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कौतुक

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यभरातून महिला या क्लिनिकला भेट देत असून त्यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ही केवळ एक आरोग्य सुविधा नसून महिलांच्या आरोग्यासाठी मिळालेली एक अनमोल भेट असल्याची भावना अनेक स्त्रियांनी बोलून दाखवली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि धाडसी निर्णय यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

महिलांचे आरोग्य हीच समाजाची शक्ती

या उपक्रमाबद्दल बोलताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, मेनोपॉज हा कोणताही आजार नसून तो महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक बदल आहे. मात्र, या काळात त्यांना योग्य दिशा मिळणे आवश्यक असते. राज्यातील प्रत्येक महिलेला या संवेदनशील टप्प्यावर सन्मान आणि योग्य उपचार मिळावेत, हाच या क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा घरातील स्त्री निरोगी आणि सक्षम असेल, तेव्हाच कुटुंब आणि पर्यायाने समाज प्रगती करू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 

Topics mentioned in this article