Airplane Color: विमानांचा रंग पांढराच का असतो? या मागे दडली आहेत 5 मोठी कारणे

या सर्व कारणांमुळे विमान कंपन्या पांढऱ्या रंगालाच आपली पहिली पसंती देतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाशात उडणारे विमान असो वा विमानतळावर उभी असलेली विमाने, बहुतांश विमानांचा मूळ रंग पांढराच असतो. कंपन्या आपला लोगो किंवा डिझाइन बदलतात, पण बेस कलर पांढराच ठेवला जातो. ही केवळ परंपरा नसून यामागे ठोस वैज्ञानिक आणि आर्थिक कारणे आहेत. विमाने तासनतास आकाशात, थेट प्रखर सूर्यप्रकाशात उडत असतात. पांढरा रंग सूर्यकिरण परावर्तित (Reflect) करतो. ज्यामुळे विमानाचे बाहेरील कवच जास्त गरम होत नाही. यामुळे विमानातील संवेदनशील उपकरणे सुरक्षित राहतात आणि केबिनमधील तापमान नियंत्रित करणे सोपे जाते. पांढरा रंग विमानासाठी एका 'सनस्क्रीन'प्रमाणे काम करतो.

सुरक्षेच्या दृष्टीने पांढरा रंग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. विमानाच्या बॉडीवर पडलेले तडे (Cracks), तेलाची गळती किंवा गंज पांढऱ्या रंगामुळे तंत्रज्ञांना लगेच दिसून येतो. गडद रंग असेल तर असे दोष लपले जाण्याची शक्यता असते. याशिवाय, संशोधनानुसार पांढऱ्या रंगाची विमाने पक्षांना लांबून स्पष्ट दिसतात, ज्यामुळे 'बर्ड स्ट्राईक'च्या (पक्ष्यांशी होणारी टक्कर) घटना कमी होतात. विमानाला रंग देणे ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे. पांढऱ्या रंगाचे वजन इतर रंगांच्या तुलनेत कमी असते. 

Advertisement

नक्की वाचा - Washroom च्या दरवाजावर 'WC' का लिहिलेले असते? 99 टक्के लोकांना माहीत नाही याचा अर्थ

विमानात जेवढा जास्त रंग लावला जाईल, तेवढे त्याचे वजन वाढते आणि परिणामी इंधन जास्त खर्च होते. पांढरा रंग हलका असल्याने विमानाचे वजन कमी राहते आणि इंधन वाचते. तसेच उन्हामुळे पांढरा रंग लवकर फिका पडत नाही, त्यामुळे वारंवार पेंट करण्याचा खर्च वाचतो. विमानाला पांढरा रंग देण्याचे आणखी एक रंजक कारण म्हणजे पक्षी. गडद रंगाच्या तुलनेत आकाशात पांढरा रंग उठून दिसतो. यामुळे पक्षी लांबूनच विमान पाहू शकतात आणि आपली दिशा बदलतात. यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. या सर्व कारणांमुळे विमान कंपन्या पांढऱ्या रंगालाच आपली पहिली पसंती देतात.

तांत्रिक फायदे आणि सुरक्षा

  • 1. तापमान: पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही, त्यामुळे जमिनीवर किंवा हवेत असताना विमान थंड राहण्यास मदत होते.
  • 2. दुरुस्ती: विमानाला कुठेही डेंट पडला किंवा नुकसान झाले तर ते पांढऱ्या रंगावर लवकर स्पष्ट दिसते. यामुळे देखभालीचे काम सोपे आणि अचूक होते.
  • 3. पुनर्विक्री मूल्य: पांढऱ्या रंगाच्या विमानांची पुनर्विक्री करणे सोपे असते, कारण नवीन मालकाला फक्त लोगो बदलावा लागतो, पूर्ण रंग नाही.

विमानाचा पांढरा रंग हा केवळ रंगाचा प्रश्न नसून तो इंजिनिअरिंगचा एक भाग आहे. यामुळे विमानाचे आयुर्मान वाढते आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होतो.