- जिलेबीला इंग्रजीत प्रामुख्याने Jalebi असेच नाव ओळखले जाते कारण ती पारंपरिक भारतीय मिठाई आहे
- जिलेबीला इंग्रजीत Deep fried spiral shaped sweet soaked in sugar syrup अशा प्रकारे वर्णन केले जाते
- जिलेबीचा मूळ शब्द अरबी भाषेतील जलाबिया किंवा पर्शियन शब्द जलिबिया यावरून आलेला आहे
आपल्या दैनंदिन जीवनात आपण असे अनेक शब्द वापरतो, ज्यांचे इंग्रजी नाव आपल्याला ठाऊक नसते. असाच एक पदार्थ म्हणजे सर्वांची लाडकी 'जिलेबी'. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच ही रसाळ जिलेबी आवडते. पण कधी विचार केला आहे का की याला इंग्रजीत नक्की काय म्हणतात? जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि साखरेच्या पाकात डबडबलेली जिलेबी सर्वांनाच प्रिय आहे. पण या जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात, असा प्रश्न विचारला तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. तांत्रिकदृष्ट्या जिलेबीला इंग्रजी भाषेत 'Jalebi' हेच नाव रूढ आहे. मात्र, पाश्चात्य देशात त्याचे वर्णन 'Funnel Cake' असे केले जाते.
'सिरप कोटेड डेझर्ट' म्हणून ओळखली जाणारी ही जिलेबी मुळात अरबी 'जलाबिया' शब्दावरून भारतात आली आणि इथलीच होऊन गेली. खरं तर, जिलेबीला इंग्रजीत प्रामुख्याने 'Jalebi' असंच म्हटलं जातं. कारण ही एक पारंपरिक भारतीय मिठाई असून त्यासाठी कोणताही एक विशिष्ट इंग्रजी शब्द शब्दकोशात नाही. मात्र, जर तुम्हाला कोणाला इंग्रजीत याची ओळख करून द्यायची असेल, तर तुम्ही 'Deep fried spiral shaped sweet soaked in sugar syrup' किंवा 'Indian funnel cake soaked in sugar syrup' असे म्हणू शकता.
परदेशात अनेक ठिकाणी याला 'Sweet Pretzel' किंवा 'Coiled Funnel Cake' या नावांनीही ओळखले जाते. काही लोक याला 'Indian syrup-coated dessert' असेही संबोधतात. जलेबी हा शब्द मूळचा भारतीय नाही. हा शब्द अरबी भाषेतील 'जलाबिया' किंवा पर्शियन शब्द 'जलिबिया' पासून आला आहे. मध्ययुगीन काळातील अनेक पुस्तकांमध्ये 'जलाबिया' या मिठाईचा उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे इराणमध्ये आजही याला 'जुलाबिया' किंवा 'जुलुबिया' या नावाने ओळखले जाते.
नक्की वाचा - Heatstroke: आला उन्हाळा, आपले आरोग्य सांभाळा! उष्माघातापासून बचाव कसा कराल?
आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या जिलेबीचा इतिहास आणि तिचे इंग्रजी नाव मोठे रंजक आहे. जिलेबीला इंग्रजीत 'Jalebi' म्हणत असले तरी त्याचे वर्णन 'Deep fried spiral shaped sweet' असे केले जाते. अनेक ठिकाणी याला 'Indian funnel cake' असेही म्हणतात. पर्शियन 'जलिबिया' शब्दावरून हा शब्द रूढ झाला. केवळ भारतच नव्हे, तर जगभरात आता ही गोड जिलेबी याच नावाने लोकप्रिय होत आहे.