Chandra Shani Yog : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी त्यांच्या चाली बदलत असतात. हे ग्रह इतर ग्रहांसोबत मिळून विविध युतींची निर्मिती करतात,ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, 27 जानेवारी रोजी चंद्रमा संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शनीदेखील मीन राशीत स्थित आहे. अशा परिस्थितीत शनिची तृतीय दृष्टी चंद्रावर पडेल,ज्याचा नकारात्मक प्रभाव 12 पैकी 3 राशींवर होऊ शकतो. कोणत्या 3 राशींना सर्वात जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती.
या राशीच्या लोकांनी सावध राहा
1. कर्क राशी
चंद्रमा आणि शनी यांच्या योगामुळे कर्क राशीच्या जातकांनी थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे. या काळात तुम्हाला आत्मविश्वासात कमतरता जाणवू शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी पुरेसा विचार करणे गरजेचे आहे. तसेच, लहान-सहान गोष्टींवरून तणाव जाणवण्याची शक्यता आहे.नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आपण शिवलिंगावर जल अर्पण करू शकता. यामुळे मानसिक शांती मिळण्यास मदत होते.
नक्की वाचा >> Pune News: हापूस आंब्याच्या पेटीचा दर फुटला, किंमत ऐकून थंडीतही फुटेल घाम
2. वृषभ राशी
वृषभ राशीच्या जातकांना या काळात तणाव आणि मानसिक दडपण जाणवू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा मनमुटाव होण्याची शक्यता आहे.तसेच,या काळात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे,अन्यथा त्याचे अयोग्यावर परिणाम होऊ शकतात.
याशिवाय, वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. छोटी चूकही तुमचं मोठं नुकसान करू शकते.
3. वृश्चिक राशी
चंद्रमा आणि शनीच्या योगामुळे वृश्चिक राशीच्या जातकांना या काळात अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. विशेषत: कार्यस्थळी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जे काम तुम्ही सहजपणे पूर्ण करत होता,त्यातही उशीर किंवा अडथळे येऊ शकतात.
खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम न मिळाल्याने चिडचिड आणि तणाव वाढू शकतो.या काळात मानसिक त्रासही जाणवू शकतो. मनात नकारात्मक विचार येणे,अवाजवी चिंता करणे किंवा किरकोळ गोष्टींवरून अस्वस्थ होणे शक्य आहे.अशा परिस्थितीत स्वतःला शांत,संतुलित आणि सकारात्मक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.