Trending News : 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी? भारतातील 'या' राज्यात लवकरच..

मागील काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्यांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mobile Banned For Children

Mobile Addiction In Children : मागील काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्यांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. लहान मुलांना स्मार्टफोनचं व्यसन लागलं असून सोशल मीडियावर चुकीचे कंटेंट पाहणाऱ्यांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक गंभीर बाब बनली आहे. या समस्येवर उपाय म्हणून कर्नाटकमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी स्मार्टफोनच्या वापरावर मर्यादा घालण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून अशा प्रकारच्या प्रस्तावावर विचार करण्यात येणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी सरकारी विद्यापीठांचे कुलगुरू (Vice Chancellors) सोबतच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला आहे. अशा प्रकारचा उपाय लागू करण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत त्यांनी सर्वांची मते जाणून घेतली. सिद्धरामैया यांनी या बैठकीत म्हटलंय की, "सरकार अल्पवयीन मुलांच्या मोबाईल फोन वापरावर नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे की नाही,यावर चर्चा सुरू आहे.मुलांना ड्रग्जची सवयही लागली आहे. ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय देशांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी मोबाईल फोन बंदीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. आम्ही 16 वर्षांखालील मुलांसाठी या प्रस्तावाचा विचार करत आहोत.अनेक मुलं सोशल मीडियाच्या व्यसनाचं बळी ठरत आहेत."

नक्की वाचा >> मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 21 टन प्रोपोलिन गॅस टँकरला पुन्हा अपघात, ब्रेक फेल झाला अन् चालकाने पुढे जे केलं..

ही बंदी 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर लागू होणार नाही

"कर्नाटक सरकारने संकेत दिला आहे की ही बंदी 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांवर लागू होणार नाही. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचा नियम लागू करण्याच्या शक्यतेवर विचार सुरू आहे. राज्य सरकार या बंदीबाबतच्या विविध पैलूंचीही तपासणी करत आहे. नियमाचे पालन कसे करायचे, ते नियम कशा पद्धतीने लागू करायचे आणि शैक्षणिक (academic) कारणांसाठी कोणत्या प्रमाणात सवलत द्यायची,या सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे.अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,  स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे.यासोबतच त्यांच्या वर्तनातही बदल दिसत आहेत. याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत आहे."

नक्की वाचा >> Holi Holiday 2026: होळीच्या सुट्ट्यांबाबत मोठी अपडेट, शाळेला सुट्टी कधी? 3 की 4 मार्च? पाहा संपूर्ण लिस्ट

Topics mentioned in this article