Sharad Purnima 2024 Wishes In Marathi: आश्विन महिन्यातील पौर्णिमेचे विशेष महत्त्व असते. या पौर्णिमेस शरद पौर्णिमा (Sharad Purnima 2024) आणि कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) असेही म्हणतात. आरोग्य, ऐश्वर्य, सुख-शांती, समृद्धी प्रदान करणारा कोजागरी पौर्णिमेचा हा उत्सव यंदा 16 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आराध्य देवतेची पूजा करावी आणि दुधाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा, अशी परंपरा आहे. शरद पौर्णिमेनिमित्त आपल्या मित्रपरिवारासह नातेवाईकांना खास शुभेच्छा पाठवून सण साजरा करा.
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ( Sharad Purnima 2024 Wishes In Marathi )
शरद पौर्णिमेची पवित्र रात्र
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर
सुख, समृद्धीचा करो वर्षाव
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शरद पौर्णिमेच्या दिवशी करतो प्रार्थना
जीवनात तुम्हाला लाभो सुख-समृद्धी हीच मनोकामना
देवी लक्ष्मीचीही होवो कृपा
मंगलमय सण करा साजरा
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Parenting Tips: रामायणातील या 5 गोष्टी तुमच्या मुलांना शिकवा, जीवनामध्ये होईल मोठा फायदा)
चला सर्वजण एकत्रित मिळून
शरद पौर्णिमेच्या दिवशी घेऊया चंद्राचा आशीर्वाद
जीवन होईल समृद्ध आणि आनंदी
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेचा रंग वेगळा
चांदण्या रात्री होतो अमृताचा वर्षाव
देवी लक्ष्मीमाता देवो सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)
शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र दिसतो सर्वात सुंदर
आणि आशीर्वादाचाही करतो वर्षाव
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला मिळो मोठे लाभ
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शरद पौर्णिमेची रात्र असते सर्वात सुंदर
या रात्री देवांच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा होतो वर्षाव
चंद्राचा कोमल चांदणे आणि देवी लक्ष्मीचे प्रेम
कोजागिरी पौर्णिमेचा सण तुमच्यासाठी ठरो मंगलमय
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)
शरद पौर्णिमेचा उत्सव
तुमच्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येवो
लक्ष्मीमातेचा तुम्हाला आशीर्वाद मिळो
हा सण तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरो
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.