Korean Skin: '4-2-4' कोरियन स्किन केअर रूटीनचे करा पालन अन् घरगुती उपायातून मिळवा कोरियन ग्लास स्किन

या पद्धतीमध्ये एकूण 10 मिनिटांचा वेळ लागतो. यात पहिल्या 4 मिनिटांत ऑईल क्लींजरने मसाज केला जातो.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कोरियन स्किन केअरमध्ये ४-२-४ हा नियम डबल क्लींजिंगवर आधारित असून त्वचा स्वच्छतेसाठी उपयोगी आहे
  • या पद्धतीत पहिल्या चार मिनिटांत ऑईल क्लींजरने मसाज केल्याने मेकअप आणि तेल विरघळतात
  • नंतरच्या दोन मिनिटांत फोम किंवा जेल क्लींजरने छिद्रांतली घाण दूर केली जाते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Korean Skin Care Rule: जगामध्ये सध्या 'कोरियन स्किन केअर'ची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेषतः कोरियन महिलांची त्वचा अत्यंत नितळ आणि चमकदार असण्यामागे '4-2-4' हा खास नियम असल्याचे सांगितले जाते. हा नियम मुख्यत्वे 'डबल क्लींजिंग' या संकल्पनेवर आधारित आहे. महागड्या ब्युटी ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरातच शास्त्रीय पद्धतीने त्वचा कशी स्वच्छ करावी, याचे मार्गदर्शन हा नियम देतो.

या पद्धतीमध्ये एकूण 10 मिनिटांचा वेळ लागतो. यात पहिल्या 4 मिनिटांत ऑईल क्लींजरने मसाज केला जातो. जो चेहऱ्यावरील मेकअप आणि जास्तीचे तेल विरघळवतो. त्यानंतरच्या 2 मिनिटांत फोम किंवा जेल क्लींजरने उर्वरित अशुद्धी दूर केली जाते. शेवटची 4 मिनिटे चेहरा पाण्याने धुण्यासाठी राखीव असतात. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते. दररोज सनस्क्रीन आणि प्रदूषणाचा सामना करणाऱ्या त्वचेसाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते.

नक्की वाचा - Vastu Shastra Tips: घरात कबुतराने अंडी दिली तर काय होते? शुभ की अशुभ? जाणून घ्या सविस्तर माहिती

तुम्हालाही कोरियन मुलींसारखी 'ग्लास स्किन' हवी आहे का? तर मग आता पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. कोरियन महिलांच्या सौंदर्याचे गुपित असलेल्या '4-2-4' नियमाचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा घरीच खिळवू शकता. हा नियम पाळल्यास चेहऱ्यावरील घाण, मेकअप आणि तेल पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते.

Advertisement

असा करा 4-2-4 नियमाचा वापर:

  • पहिली 4 मिनिटे (ऑईल मसाज): कोरड्या चेहऱ्यावर क्लींजिंग ऑईल लावून 4 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील मेकअप आणि सनस्क्रीनचे थर विरघळतात.
  • पुढची 2 मिनिटे (फेस वॉश): फोमिंग फेस वॉश लावून 2 मिनिटे वर्तुळाकार हालचालीत मसाज करा. यामुळे छिद्रांमधील घाण बाहेर येते.
  • शेवटची 4 मिनिटे (वॉटर वॉश): पहिले 2 मिनिटे कोमट पाण्याने आणि नंतरची 2 मिनिटे थंड पाण्याने चेहरा धुवा. कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ होते, तर थंड पाण्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन ताजेपणा येतो.