आजकाल कोरियन ड्रामांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. या मालिकांमधील कलाकारांची निरोगी आणि चमकदार त्वचा अनेकांना आकर्षित करते. ज्याला 'ग्लास स्किन' असेही म्हटले जाते. ही त्वचा काचेसारखी पारदर्शक आणि नितळ दिसते. भारतातही अनेक लोक अशी चमकदार त्वचा मिळवण्याची इच्छा बाळगतात. यासाठी रात्रीच्या वेळी केलेल्या काही साध्या गोष्टी खूप फायदेशीर ठरू शकतात. या गोष्टी केल्यास तुम्हाला ही चमकदार आणि काचेसारखी चकाकणारी त्वचा मिळवण्यास मदचत नक्कीच होईल.
झोपण्याच्या आधी 'हे' नक्की करा
अनेकदा अनेकांना ऑफिस किंवा बाहेरून आल्यावर चेहरा न धुता झोपण्याची सवय असते. यामुळे चेहऱ्यावर असलेली धूळ आणि प्रदूषण तसेच राहते. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. म्हणून, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही बर्फाच्या पाण्याचा वापर करू शकता. अनेक सेलिब्रिटीसुद्धा या पद्धतीचा अवलंब करतात. बर्फाच्या पाण्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. शिवाय चेहऱ्यावर त्याचा काहीही वाईट परिणाम होत नाही.
- एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काही बर्फाचे तुकडे टाका.
- या थंडगार पाण्यात चेहरा काही सेकंदांसाठी बुडवा. ही प्रक्रिया 4 ते 5 वेळा करा.
- यानंतर, चेहऱ्याला हलक्या हातांनी स्वच्छ पुसून घ्या.
- जर चेहरा कोरडा वाटत असेल, तर चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर लावा.
पुरेशी झोप आणि आहार
रात्रीच्या त्वचेच्या दिनचर्येव्यतिरिक्त पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. कोरियन लोक लवकर झोपतात आणि 7 ते 8 तास पूर्ण झोप घेतात. ज्यामुळे त्यांची त्वचा ताजीतवानी दिसते. पुरेशी झोप मिळाल्याने त्वचेला आवश्यक पोषण मिळते. ती चमकदार बनते.कोरीयन लोक याचे तंतोतंत पालन करतात. त्यामुळे त्यांची त्वचा कधी ही आणि कुठेही पाहीली असता चमकदार दिसते.
त्वचा चमकदार कशी दिसते?
कोरियन लोकांच्या चमकदार त्वचेमागे त्यांचा आहारदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. ते सहसा उकडलेले अन्न खातात. खास करून जाणीव पूर्वक तळलेले पदार्थ खाण्याचे ते टाळतात. त्यांच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. याशिवाय, ते भरपूर पाणी पितात. पाणी प्यायल्यामुळे त्यांची त्वचा हायड्रेटेड राहते. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिल्याने त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. तुम्ही ही याचे पालन केले तर तुमची ही त्वचा नक्कीच चमकदार होईल.